Nashik ZP : CEO ओमकार पवारांकडून अधिकाऱ्यांची 6 तास झाडाझडती ; कुपोषणाची लपाछपवी, रखडलेली घरकुले, सगळच काढलं..

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar : जिल्हा परिषदेच्या 6 तास चाललेल्या समन्वय बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik ZP CEO Omkar PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या समन्वय बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अनेक बाबींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कामातील हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या योजना, कुपोषित बालकांची चुकीची आकडेवारी, रखडलेली घरकुले आणि ग्रामपंचायतींच्या ऑनलाइन तक्रारींचा आढावा घेत त्यांनी विभागप्रमुख, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना कामकाजात तातडीने सुधारणा करून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषदेत तब्बल सहा तास ही बैठक चालली. बैठकीत सीईओ ओमकार पवार यांनी विभागनिहाय कामांचा सविस्तर आढावा घेतला. जलजीवन मिशनअंतर्गत अनेक योजना पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, तसेच त्यांचे हस्तांतरणही प्रलंबित असल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवारच्या कामांकडेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आणून देत संबंधित उपअभियंत्यांवर विभागीय चौकशीचा इशारा दिला.

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik ZP News : नाशिकमध्ये मोफत गणवेश योजनेत मोठा झोल, CEO ओमकार पवारांकडून 16 मुख्याध्यापकांना नोटिसा.. कारवाईकडे लक्ष

महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांची वस्तुस्थिती लपवून कमी आकडे सादर केले जात असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा देत कुपोषणाविरोधात पुन्हा धडक मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत मंजूर झालेल्या एक लाख ६२ हजार घरकुलांपैकी आतापर्यंत ७३ हजार ४९१ घरे पूर्ण झाली असून ८७ हजार ५९७ घरे अद्यापही अपूर्ण आहेत. पूर्णत्वास गेलेल्या घरकुलांचा अंतिम हप्ता तातडीने लाभार्थ्यांना वितरित करण्याबरोबरच उर्वरित घरकुलांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गती द्यावी, अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या.

Nashik Zilla Parishad CEO Omkar Pawar
Nashik Crime : स्क्रू ड्रायव्हरने उघडलं न्यायालयाचं गेट ; न्यायाधीशांच्या निवासस्थानाची रेकी करणाऱ्या दोघांना कठोर शिक्षा

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, दीपक पाटील, लेखा व वित्त अधिकारी प्रदीप मुळे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com