Nashik ZP : मंत्री कोकाटेंना मुलीला अध्यक्ष करण्याचे वेध, भुजबळ आडवे येणार?

Manikrao Kokate daughter Simantini Kokate : माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतीनी कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
Manikrao Kokate daughter Simantini Kokate
Manikrao Kokate daughter Simantini KokateSarkarnama
Published on
Updated on

Nashik ZP News : नाशिक जिल्ह्यात १५ पैकी सात आमदार हे एकट्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यातले माणिकराव कोकाटे यांच्यासह छगन भुजबळ व नरहरी झिरवाळ हे तिघे मंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे.

सात आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात योग्य ताकद लावली व जास्तीत जास्त सदस्य निवडून आणले तरी 'मिनी मंत्रालयात' राष्ट्रवादीचा झेंडा फडकू शकतो व अध्यक्षपदाचा सोपान सहज चढता येऊ शकतो असे गणित सद्या मांडले जात आहे. परंतु मंत्र्यांमधील असलेला अंतर्गत संघर्ष पाहाता राष्ट्रवादीतच यावरुन मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यात आता विशेष करुन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. कोकाटेंना कन्या सीमंतिनी यांना अध्यक्ष करण्याचे वेध लागले आहेत. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गटातून त्या निवडणुक लढवण्याची तयारी करत आहेत. सिन्नर तालुक्यातील सहाही गटांमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून मंत्री कोकाटे मुलीसाठी अध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे.

Manikrao Kokate daughter Simantini Kokate
MNS Politics : मनसे कार्यकर्त्यांना बोगस मतदार शोधून काढण्याचे आदेश, निवडणुकांपूर्वी घोळ बाहेर काढणार

परंतु कोकाटेंच्या महत्वाकांक्षेवर त्यांचे कट्टर विरोधक असलेले छगन भुजबळ कशी चाल आखतात व काय भूमिका घेतात यावर पुढचं समीकरण अवलंबून असेल. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधरण गटासाठी राखीव आहे. अशात भुजबळांच्या येवला मतदारसंघातही पाचमधील तीन गट हे सर्वसाधरणसाठी राखीव आहेत. त्यामुळे भुजबळांकडूनही आपल्या एखाद्या समर्थकाला पुढे आणलं जाऊ शकतं. त्यामुळे कोकाटे व भुजबळांमध्ये नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

कारण भुजबळांना डावलून अजित पवारांनी जेव्हा कोकाटेंना मंत्री केलं तेव्हापासून तर दोघांमधील वाद अधिकच उफाळला. त्यामुळे त्याचा बदला भुजबळ घेणार का? माणिकराव कोकाटेंच्या वाटेत आडवे येणार का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत असून पुढच्या काळातच त्याचे उत्तर मिळणार आहे.

Manikrao Kokate daughter Simantini Kokate
Gulabrao Patil : मी आधी वारकरी आणि मग राजकारणी, मंत्री गुलाबरावांनी वारकऱ्यांना दिला मोठा शब्द

दरम्यान कोकाटेंच्या लेकीपुढे आता काका भारत कोकाटे यांचे आव्हान आहे. कारण दोघेही सोमठाणे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी भारत कोकाटेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काका-पुतणीत सामना नको म्हणून भारत कोकाटेंची अशी इच्छा आहे की, सीमंतिनी कोकाटे यांनी मुसळगाव गटातून लढावे. मात्र मंत्री कोकाटे सोमठाणे गटातूनच लेकीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याने काका-पुतणीमधील सामना अटळ असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com