
Nashik Politics : नाशिक तालुक्यातील ४ गट आणि ८ गणांच्या आरक्षणात खुल्या प्रवर्गातील उमदेवारांचा हिरमोड झाला आहे. कारण ४ पैकी ४ गट राखीव झाले आहेत. त्यात पळसे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, गिरणारे आणि गोवर्धन हे २ गट आदिवासींसाठी तर एकलहरे हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. गोवर्धन गट हा सलग दुसऱ्यांदा आदिवासींसाठी राखीव झाल्याने येथे महिलांना संधी मिळेल.
माजी अध्यक्षांसह सभापतींची संधी हुकली
शहरालगतच्या गावांचा गट
व गणांमध्ये समावेश.
राष्ट्रवादी, शिवसेनेला सर्वाधिक कौल देणारे गट.
आरक्षणामुळे मातब्बर
इच्छुकांचा हिरमोड.
गट व गणांच्या आरक्षणामुळे अनपेक्षित लॉटरी.
पंचायत समिती गणांचा विचार केला तर सय्यदपिंप्री अन् लहवित हे दोन्ही खुले झाले आहेत. पळसे आणि विल्होळी गण नामप्र (महिला) साठी राखीव झाले असून, एकलहरे गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. विशेष म्हणजे गिरणारे, देवरगाव हे दोन्ही गण अनुसूचित जमाती महिलेसाठी तर गोवर्धन गण हा अनुसूचित जमातीसाठी खुला झाला आहे.
गोवर्धन गट - गतवेळी आदिवासी राखीव होता. यंदाही आदिवासींसाठी (महिला) राखीव झाला आहे. येथून आमदार हिरामण खोसकर निवडून आले होते. त्यानंतर ते विधानसभेत पोहोचले. गिरणारे गट गतवेळी आदिवासी महिलेसाठी राखीव होता. येथून राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या सुनबाई अपर्णा खोसकर या निवडून येऊन पुढे जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापतीही झाल्या होत्या.
या वेळीही हा गट आदिवासी खुला झाला आहे. यात गिरणारे अन् देवरगाव हे दोन गणांचा समावेश असून, गिरणारे गण हा गतवेळप्रमाणेच आदिवासी महिलेसाठी राखीव झाला. तर देवरगाव गणही आदिवासी महिलेसाठीच राखीव आहे.
पळसे गट : हा यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून तेवढाच काय तो दिलासा इतर प्रवर्गाला मिळाला. आता येथेच इच्छुकांची झुंबड उडणार असून इतर गटांमधील उमेदवारही येथूनच भिडण्याची शक्यता आहे. एकलहरे या गटातील इच्छुकांचा हिरमोड झाला. गेल्यावेळी हा गट सर्वसाधारण अर्थात खुला होता. एकहलरे गण हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. गतवेळी तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी होता. लहवीत गट खुला (सर्वसाधारण) झाला आहे. गतवेळी तो अनुसूचित जातीसाठी राखीव होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.