Chhagan Bhujbal : येवल्यात जातीय समीकरणांचा प्रभाव दिसणार, मंत्री भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक

Yeola ZP Reservation : येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांचे व पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्री भुजबळांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
Chhagan-Bhujbal
Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण आज जाहीर झाले. बहुतांशी प्रमुख ठिकाणी सोयीचे आरक्षण निघाले असल्यामुळे इच्छुकांचे रस्ते मोकळे झाले आहेत. मात्र सर्वच पक्षांकडून मातब्बर इच्छुक असल्याने यावेळी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच होताना दिसेल. विशेषतः तालुक्यावर स्थानिक नेत्यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्याही वर्चस्वाची आणि इच्छुक असलेल्या मातब्बरांच्या अस्तित्वाची लढाई यावेळी दिसेल.

येथील राजकारणात मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व वाढले आहे, परंतु माजी आमदार मारोतराव पवार व संभाजी पवार यांचे नगरसुल गटात, आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांचे राजापूर गटात, पाटोदा, मुखेड गटात सहकार नेते अंबादास बनकर यांचे व अंदरसूल गटात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचे कायमस्वरूपी वर्चस्व राहिले आहे. किंबहुना पवार, दराडे, बनकर यांच्या घरातील उमेदवार या गटांमध्ये उमेदवारी करतातच. यावेळी राजापूर गट एससीसाठी आरक्षित झाल्याने युवा नेते कुणाल दराडे यांची मोठी गैरसोय झाल्याने त्यांनी इतर गटातून चाचपणी केल्यास राजकीय संदर्भ बदलताना दिसतील.

नगरसूल व मुखेड सर्वसाधारण झाल्याने या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढवू शकते, त्याचवेळी अंदरसूलमध्ये मंत्री भुजबळ समर्थक दिलीप खैरे इच्छुक होते. परंतु येथे महिलेचे सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाल्याने त्यांच्या भूमिकेवरच इतर इच्छुकांची भवितव्य अवलंबून आहे.

Chhagan-Bhujbal
Nashik Digital Arrest Scam : नाशिकमध्ये सरन्यायाधीश गवईंच्या नावे 'डिजिटल अरेस्ट', 71 लाख उकळले

सद्यःस्थितीत येथील राजकारणाचे सत्ताधारी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र आहे. त्यातही भुजबळांच्या सोबत शिंदे शिवसेनेचे सूत्र जुळत नाही तर भाजपही जागा वाटपात जास्त आग्रही असल्याने यात तिघे एकत्र लढतील की स्वतंत्र अस्तित्व आजमावतील यावरही बहुतांशी चित्र अवलंबून असेल. महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कॉंग्रेसमध्ये एकोपा आहे मात्र सक्षम उमेदवार देऊन त्यांच्या विजयासाठी शिंदे- दराडे या नेत्यांना जोर लावावा लागणार आहे.

Chhagan-Bhujbal
Nashik Prakash Londhe : लोढेंच्या अडचणीत पक्षही सोबत नाही, मंत्री आठवलेही चार हात लांब ..?

पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी असल्याने यावर डोळा ठेवून गणांमध्ये देखील इच्छुकांची संख्या वाढणार आहे. विशेषत: पाटोदा, नगरसूल हे गण ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने येथे इच्छुकांची संख्या वाढू शकते. याशिवाय धुळगाव, सावरगाव, राजापूर, उंदीरवाडी, अंदरसूल, निमगाव मढ हे गणही सर्वसाधारण आहेत. त्यामुळे येथे देखील मातब्बरांमध्ये मोठी रस्सीखेच होताना दिसेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com