Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात पुरोहितांची कमतरता नको, सरकार देणार पौरोहित्याचे प्रशिक्षण

Nashik Kumbh Mela, priest shortage : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक आले होते. त्या तुलनेत रोहितांची कमतरता भासली होती. त्यामुळे नाशिकसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिकचा कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला असून ३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

नाशिकमधील कुंभमेळ्याआधी प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला. एकुण ४५ दिवसांच्या पर्वकाळात भाविकांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्याला हजेरी लावली. तब्बल ६६ कोटी पर्यटक, भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पुरोहितांची मोठी कमतरता भासली होती. तीच कमतरता नाशिकला नको भासायला म्हणून सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्येही सिंहस्थ कुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक व पर्यटक येण्याची शक्यता आहे. या भाविकांना गोदावरी पूजनासह अन्य धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुरोहितांची गरज भासणार आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत.

Nashik Kumbh Mela
Nashik Politics : नाशिकला आता काही पालकमंत्री मिळत नाही, फडणवीस सरकारनेच दिले संकेत

देशासह विदेशातून आलेल्या भाविकांना नाशिक शहर व परिसरातील धार्मिक पर्यटन घडवू शकतील अशा टूरिस्ट गाईडसाठीही विशेष अभ्यासक्रम तयार केला जात आहे. पुढच्या महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.

राज्य सरकारकडून कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. नुकतीच त्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती व शिखर समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. तसेच इतर महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांची ही गरज ओळखून तसेच तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची संधी यातून सरकारने हेरली आहे. कौशल्य विकास विभागाच्या वतीने सरकारकडून पौराहित्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : भाजपकडून नाराजांवर मलमपट्टी ; भुजबळ, भुसे, कोकाटे कुंभमेळा मंत्री समितीवर

हे प्रशिक्षण घेण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असावे लागणार आहे. यामध्ये, भाविकांना संकल्प सोडणे, पंचोपचार, गोदावरी पूजन, सिंहस्थ पूजन विधी यासह अन्य धार्मिक विधी सांगू शकणारा प्रशिक्षित पुजारीवर्ग उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यातून तरुण वर्गालाही रोजगार मिळेल शिवाय भाविकांनाही सहकार्य होईल. (Kumb Mela)

या प्रशिक्षण वर्गात किमान ४५ तासांच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात आहे. त्यात १५ तासिका या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या असतील. दरम्यान सरकारच्या पुरोहित प्रशिक्षणाच्या या उपक्रमावर पुरोहित संघाची काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com