Dada Bhuse News : नाशिकचं राजकारण पुन्हा तापणार ; पालकमंत्री भुसेंचा 'तो' निर्णय अन् तीन खासदारांचा 'पत्ता कट' ?

Nashik Political News : ''...पण माजी पालकमंत्री छगन भुजबळांची मंत्रिमंडळात ‘एन्ट्री’ होताच हा विषयही मागे पडला !''
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

Nashik: नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, भाजपचे डॉ. भारती पवार व डॉ. सुभाष भामरे असे तीन खासदार आहेत. मात्र, ज्या निधीवरुन गेली चार वर्षे नाशिकमध्ये पालकमंत्री व आमदारांमध्ये संघर्ष उभा राहिला. आता त्याच जिल्हा नियोजनाच्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील खासदारांचाही पत्ता कापला जाणार आहे. त्यामुळे फक्त आमदारांनाच निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री दादा भुसेंनी घेतल्याने जिल्ह्यातील तिन्ही खासदार नाराज होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे पालकमंत्री असताना शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा नियोजनच्या निधीचे असमान वाटप झाल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय वातावरण तापवलं होतं. पण हा संघर्ष थेट तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता.

महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर हा विषय संपला आणि दादा भुसे पालकमंत्री झाले. यानंतरही आमदार कांदे व पालकमंत्री भुसे यांच्यात काही काळ निधीवरुन दुरावा निर्माण झाला होता. पण माजी पालकमंत्री छगन भुजबळांची मंत्रिमंडळात ‘एन्ट्री’ होताच हा विषयही मागे पडला.

Dada Bhuse
INDIA Meeting News : त्यांना यंत्र घाबरतात, माणसं घाबरतात अन् त्यांचे आमदारही घाबरतात, म्हणूनच...

नाशिकचे पालकमंत्री कोण होणार याविषयी बरेच दिवस चर्चा सुरु होती. यात दादा भुसें(Dada Bhuse) सह भुजबळ आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची नावे चर्चेत होती. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी एक हजार ९३ कोटी रुपयांचे नियोजन सुरु केले आहे. या निधीतून ग्रामीण भागाचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील ११ आमदार कामे सूचवणार आहेत. या आमदारांपैकी राष्ट्रवादीचे सहा, शिवसेनेचे दोन व भाजपचे दोन असे दहा आमदार सत्ताधारी गटात आहेत.

जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व भाजपचे डॉ. भारती पवार (Bharti Pawar) व डॉ. सुभाष भामरे असे तीन खासदार आहेत. आमदार व खासदार यांचे कार्यक्षेत्र समान असून जवळपास सर्वच आमदार सत्तेत असल्यामुळे या खासदारांना निधी दिल्यास त्याचा आमदारांच्या निधीवर परिणाम होऊ शकतो.

Dada Bhuse
INDIA Mumbai Meet : ठाकरे ज्याला ‘गरूड झेप’ म्हणतात ही तर ही तर श्वापदांची टोळी; बावनकुळेंचे सडेतोड प्रत्युत्तर

यामुळे आमदारांना नाराज न करण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याचे दिसत आहे. यामुळे खासदारांनी सूचवलेल्या पत्रांमधील कामे यावेळी जिल्हा परिषदेच्या नियोजनातून निधी मंजूर केला जाणार नसल्याचे समजते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com