NCP; चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा!

धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करीत पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.
NCP workers at Dhule Police station
NCP workers at Dhule Police stationSarkarnama
Published on
Updated on

धुळे : भाजपचे (BJP) मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (Dr. Babasaheb Ambedkar) क्रांतिसूर्य महात्मा फुले, (Mahatma Phule) कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांनी भीक मागून शाळा काढली, असे वादग्रस्त विधान केले. या निषेधार्थ मंत्री पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. (NCP deemand Police FIR against Minister Chandrakant Patil)

NCP workers at Dhule Police station
Chandrakant Patil; चंद्रकांत पाटील तुमचा `डीएनए` कोणता हो?

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात शनिवारी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन, तसेच, आत्मक्लेष आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

NCP workers at Dhule Police station
Abdul Sattar; रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा असे सुचवले होते!

गेल्या काही दिवसांत शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळातील विशेषतः भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी जाणीवपूर्वक राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. तसेच, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात भर घालत मंत्री पाटील यांनी तिघा महापुरुषांबाबत अवमानजनक विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

गेल्या काही दिवसांत शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळातील विशेषतः भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी जाणीवपूर्वक राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. तसेच, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात भर घालत मंत्री पाटील यांनी तिघा महापुरुषांबाबत अवमानजनक विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आंदोलक श्री. भोसले, गोरख शर्मा, मंगेश जगताप, भिका नेरकर, उमेश महाले, रईस काझी, रईस शेख, राजेंद्र सोलंकी, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चौधरी, दीपक देवरे, सोनू घारू, दत्तू पाटील, संदीप पाटील, अमीन शेख, एजाज शेख, वाल्मीक मराठे, सरोज कदम, संगीता खैरनार, वंदना केदार, शारदा भामरे, वनिता गरुड, वर्षा सूर्यवंशी, कविता खेडकर, विमलबाई सोनवणे, स्वामिनी पारखे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com