Nashik Congress Agitation against BJP : विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी दिला महायुतीला प्रचाराचा मुद्दा?

Nashik Congress agitation in support of Rahul Gandhi criticized BJP-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वक्तव्याचा काँग्रेसने केले जिल्हाभर निषेध आंदोलन, काँग्रेस नेते गांधी यांच्या केसालाही धक्का लागल्यास केंद्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा नाशिक शहरात झालेल्या आंदोलनात कांग्रेस नेत्यांनी गुरुवारी दिला
Rahul Gandhi  Nashik Congress Agitation
Rahul Gandhi Nashik Congress AgitationSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यातील भाषणात केलेले वक्तव्य चर्चेचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्याचा सोयीनुसार अर्थ काढला जात आहे. सध्या त्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपच्या नेत्यांमध्ये याबाबत बेताल वक्तव्यांची स्पर्धा सुरू आहे. या नेत्यांना आवर घालण्याची भाजपची मानसिकता नाही. जनता आणि या देशातील मतदार भाजपला प्रतिसाद देत नसल्याने सैरभैर झालेल्या भाजप नेत्यांकडून हे प्रकार सुरू आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

त्याला काँग्रेस पक्षाकडून अजिबात किंमत दिली जाणार नाही. काँग्रेस नेते गांधी यांच्या केसालाही धक्का लागल्यास केंद्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा नाशिक शहरात झालेल्या आंदोलनात कांग्रेस नेत्यांनी गुरुवारी दिला. यावेळी निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस नेते गांधी यांच्या विषयी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून विविध प्रकारे गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत आक्रमक विधाने करून निषेध आंदोलन होत आहे.

Rahul Gandhi  Nashik Congress Agitation
Nashik Politics : कोकाटेंना आव्हान देणारा उमेदवार कोण? राजाभाऊ वाजेंपुढे प्रश्न!

राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या लोकांकडूनच आंदोलन होत असल्याने तो चर्चेचा विषय आहे. हा समाजामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक सह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये काल या प्रश्नावर काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा निषेध केला. निफाड, नाशिक, येवला, मालेगाव आणि अन्य तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले.

विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा मुद्दा करू इच्छित आहे, असा संदेश दिला जात आहे.

Rahul Gandhi  Nashik Congress Agitation
Nashik politics: इच्छुक मामा ठाकरेंची झणझणीत मिसळ आमदार सीमा हिरे यांनीही चाखली!

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि काँग्रेस दोन्हीही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप आणि आंदोलन करीत आहेत. यामध्ये महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष देखील अनपेक्षित पणे सक्रिय झाला आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे मात्र तटस्थ आहेत.

नाशिक शहर काँग्रेस कार्यालयाच्या आवारात काल यासंदर्भात निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष आकाश छाजेड आणि एन एस यु आय चे अध्यक्ष अल्तमश शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, संतोष ठाकूर, आप्पा गवळी, राकेश पवार, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, राहुल दिवे, समीना पठाण, मायाताई काळे, शहाबाद मिर्झा, अनिल बाहेत यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com