Dilip Khaire News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. प्रदीर्घकाळ हे पद रिक्त असल्याने संघटनेला दिलासा मिळाला आहे. पक्षविस्तारासाठी विधानसभा सदस्यसंख्या वाढविण्यावर त्यांचा भर असेल.
दिलीप खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. श्री खैरे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत. गेली तीस वर्ष पक्षाच्या राजकारणात त्यांची छगन भुजबळ समर्थक अशीच ओळख राहिली आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष रवींद्र पगार यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाला खैरे यांच्या नियुक्तीमुळे चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती खैरे समर्थकांसाठी दिलासादायक मानली जाते.
पक्षाच्या कार्यालयात दिलीप खैरे यांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी आपले समर्थक आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे नियुक्तीसाठी आभार व्यक्त केले. आगामी काळात आपले कामकाज कसे असेल याची चुणूक देखील दाखवून दिली.
आगामी काळात जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी काम करणार. नियमितपणे पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेतल्या जातील. सर्व पदाधिकाऱ्यांना थेट जनतेत जाऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप खैरे यांनी काही सूचना केल्या आहेत. मात्र जिल्ह्यात १५ पैकी सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. यातील ज्येष्ठ छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ हे मंत्री आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे माणिकराव कोकाटे या तिसऱ्या मंत्र्यांना पदावरून दूर व्हावे लागले.
या पार्श्वभूमीवर दिलीप खैरे यांनी केलेली घोषणा चर्चेचा विषय आहे. पंधरापैकी सात आमदार जिल्ह्यात याच पक्षाच्या आहेत. उर्वरित आमदारही सत्ताधारी महायुतीचेच आहेत. या स्थितीत सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आव्हान उभे करणार, असा राजकीय संदेश यातून मिळाला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिलेदाराने पदभार स्वीकारताच दिलेले आव्हान विरोधकांना की आपल्याच महायुतीच्या विद्यमान आमदार आणि पक्षांना? हा कार्यकर्त्यांना संदेश मानायचा.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.