BJP Sujay Vikhe On Ajit Pawar : सुजयदादा अजितदादांसाठी मैदानात, 'टार्गेट' करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, 'ठाकरे अन् पवारांच्या नेत्यांना लग्नपत्रिकाच नसते

BP Sujay Vikhe Criticizes Opposition for Targeting NCP Ajit Pawar in Pune Rajendra Hagavane Case Shirdi : पुण्यातील राजेंद्र हगवणे याने सुनेचा छळप्रकरणावर अजित पवार यांना टार्गेट करणाऱ्या विरोधकांना भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी सुनावलं.
BJP Sujay Vikhe On Ajit Pawar
BJP Sujay Vikhe On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rajendra Hagavane case : पुणे पिंपरीमधील राजेंद्र हगवणे कुटुंबाने केलेल्या छळामुळे सून वैष्णवी हिनं आत्महत्या केली. हगवणे कुटुंब म्हणजे, सुनेसाठी छळछावणीच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याने या कुटुंबावर कारवाई होत नसल्याचा आरोप होत होता.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मात्र, हे हगवणे कुटुंबाच्या छळछावणीचा इतिहास समोर आला आणि प्रकरण चांगलच पेटलं. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार देखील टार्गेट झाले. यावर अजितदादांनी खुलासा केला असला, तरी टार्गेट होत आहेत. अजितदादांसाठी भाजपचे सुजयदादा विखे मैदानात उतरले आहेत.

सुजय विखे यांनी अजितदादांना लग्नाला गेले म्हणून टार्गेट करणे चुकीचे आहे. शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाहीत. ज्या लोकांना पत्रिका येत नाही, त्या लोकांना कोणी दुसरा लग्नात गेला, तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी पवार पक्षाच्या प्रवक्त्यांना देखील लग्नाच्या पत्रिका द्यायला सुरुवात करा, असा टोला लगावला.

'आम्ही देखील लग्नाला जात असतो. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा तसा आग्रह असतो. त्यातील अनेकांच्या संसाराबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडतात, असे सांगताना मी गेलेल्या एका लग्नात, तर नवरीच लग्न लागण्याच्या अगोदरच पळून गेली होती, मग काय करणार?', असा प्रश्न सुजयदादांनी (Sujay Vikhe) अजितदादा टार्गेट करणाऱ्यांना केला.

BJP Sujay Vikhe On Ajit Pawar
Sujay Vikhe on Satyajeet Tambe BJP : सत्यजीत तांबेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा; विखे म्हणाले, 'मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी...'

राजेंद्र हगवणे याला यापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं, मात्र आज मीडियामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्याला ओळखू लागला आहे. त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. त्यामुळे राजकीय व्यक्तींना, अशा प्रकरणात ओढू नये, असे देखील सुजय विखे यांनी म्हटले.

BJP Sujay Vikhe On Ajit Pawar
Lal Nishan And Communist Party merger : देशात मोठी राजकीय घडामोड; लाल निशाण पक्षाचं 'भाकप' लिबरेशनमध्ये 'विलय'

आमच्याबरोबर देखील अनेक जण फोटो काढतात. त्यानंतर काही जण म्हणतात वाळू तस्कर आहे. हा आरोपी होता. हे टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल. प्रत्येक आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावण्याची वेळ येईल, अशी टिप्पणी देखील सुजय विखे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com