
Karjat Nagar Panchayat BJP entry : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा 11 नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला. "कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीनी कायदा हातात घेत हुकूमशाहीने सत्ता मिळवली होती. मात्र आपण कायदेशीर मार्गाने पुन्हा भाजपाची सत्ता आणली", असा टोला राम शिंदे यांनी आमदार पवार यांना यावेळी लगालवा.
मागील अनेक दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची एकहाती असलेली सत्ता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उलथून टाकत सत्तांतर घडवले. आमदार रोहित पवार गटातील 15 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक सत्तेतून बाहेर पडत, त्यांनी राम शिंदे यांच्या मध्यमातून घरोबा केला होता. यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आठ, तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश होता.
या दरम्यान तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात सत्तांतर होणार हे अटळ होते. सभापती राम शिंदे यांनी काँग्रेसच्या (Congress) रोहिणी घुले यांना नगराध्यक्षा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष मेहेत्रे यांना उपनगराध्यक्ष करीत रोहित पवारांवर बंडखोरी करीत बाहेर पडलेल्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश न करता मनाचा मोठेपणा दाखवत कुरघोडी केली.
यानंतर नूतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांनी एकत्र येत शनिवारी भाजपमध्ये (BJP) जाण्याचा मानस स्थानिक नेते प्रवीण घुले यांच्याकडे व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने प्रवीण घुले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार गटातील बाहेर पडलेले एकूण 11 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
यानुसार आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सतीश पाटील, नगरसेविका छाया शेलार, लंकाबाई खरात, ताराबाई कुलथे, ज्योती शेळके, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. आज कर्जत नगरपंचायतीवर प्रवीण घुले यांच्या माध्यमातून आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा झेंडा फडकला.
नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होता, प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, "कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीनी कायदा हातात घेत हुकुमशाहीने सत्ता मिळवली. मात्र आपण कायदेशीर मार्गाने पुन्हा भाजपची सत्ता आणली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाची नवीन अध्यादेश निर्णय पारित करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. मागील तीन वर्षांच्या काळात जो विकास खुंटला होता. त्यास आगामी काळात योग्य दिशेने कर्जतच्या विकासासाठी मार्गक्रमण करू".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.