अनोखे आंदोलन; कोश्‍यारींच्या विधानाचा धोतर जाळून निषेध

सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोश्यारी, त्रिवेदींच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन.
Agitation of Maratha community
Agitation of Maratha communitySarkarnama
Published on
Updated on

धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी शब्दात उल्लेख करीत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) आणि `भाजप`चे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्या प्रतिमेस सकल मराठा समाज, (Maratha Samaj) तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP) संताप व्यक्त करत जोडे मारो आंदोलन केले. वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. दोघांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. (NCP Deemands Register FIT against Governer Bhagatsingh koshyari)

Agitation of Maratha community
राष्ट्रवादीने दिला राज्यपालांना थेट इशारा!

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की छत्रपती शिवराय मराठा समाजाचेच नव्हे, तर सर्व जातिधर्माचे आराध्य दैवत आहेत. काही लोक प्रकाशझोतात येण्यासाठी जाणीवपूर्वक छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करीत असतात.

Agitation of Maratha community
राज्यमंत्री भारती पवारांचा घणाघात; आमदार दिलीप बनकरांनी दिशाभूल थांबवावी!

पूर्वीदेखील राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. तेव्हा कारवाईची मागणी केली. ती न झाल्याने कोश्यारी पुनःपुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत असतात. भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनीदेखील छत्रपती शिवरायांप्रति अवमानकारक आणि बदनामीकारक वक्तव्य केले. त्यामुळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मराठा समाजाचे नानासाहेब बगदे, राजेंद्र ढवळे, हनुमंत अवताडे, निंबा मराठे, रजनीश निंबाळकर, हेमंत भडक, वीरेंद्र मोरे, देवीदास पवार, नीलेश काटे, प्रफुल्ल माने, कैलास मराठे, पप्पू माने, विराज रावळे, नाना कदम, आबा कदम, विनोद जगताप, वामन मोहिते, संदीप सूर्यवंशी आदींनी केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोश्‍यारी, त्रिवेदींच्या प्रतिमेस काळे फासत दहन केले. तसेच धोतर जाळून कोश्‍यारींच्या विधानाचा निषेध केला. आंदोलनात वाल्मीक मराठे, निखिल मोमया, महेश भामरे, कल्पेश चव्हाण, मयूर देवरे, एजाज शेख सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com