Dhule NCP News : धुळ्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साकडे

NCP deemands to declare drought in Dhule district-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Dhule Drought
Dhule DroughtSarakarnama
Published on
Updated on

Dhule Drought issue : धुळे जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांच्या मदतीसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलन, निवेदने आदी मार्ग स्विकारले आहेत. आता त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील पुढे आली आहे. (NCP delegation deemands drought relief for farmers)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) पावसाअभावी संकटात सापडला आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केली आहे.

Dhule Drought
Dhule NCP News : मराठा आरक्षणाचा प्रश्न अजित पवार हेच सोडवतील

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतीपंपासाठी सलग आठ तास अखंड वीजपुरवठा करावा, चारा छावण्या सुरू करत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मागणी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली.

धुळे जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती उद्‍भवली आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वीज वितरण कंपनीतर्फे कृषिपंपासाठी सलग आठ तास अखंडितपणे वीजपुरवठा केला जावा तसेच जनावरांसाठी चारा छावण्या, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

Dhule Drought
Sakri Congress News : सद्‍भावना यात्रेतून काँग्रेसने फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

पक्षाचे सरचिटणीस संदीप बेडसे, पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील, अध्यक्ष जितेंद्र मराठे, शहर अध्यक्ष रणजित राजे भोसले, रमेश करनकाळ, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव ठाकरे, सरचिटणीस तथा वसमारचे माजी गिरीश नेरकर, डॉ. मनोज महाजन, हेमराज राजपूत, विनोद बच्छाव, प्रदीप नांद्रे, मिलिंद पाटील, कल्पेश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com