NCP Nashik News : तोडा, फोडा, भीती दाखवा अन् पक्षात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. अगोदर शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली आहे. भारतीय जनता पक्षाला मतदारच आता त्यांची जागा दाखवेल, यात काडीमात्र शंका नाही. राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्न तर ‘समता’ गेली खरी राष्ट्रवादी आता जिल्ह्यात राहिली आहे, असे माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी सांगितले. (NCP leaders says, we are real NCP followers, we are with Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करीत राज्यातील शिंदे-भाजप (BJP) सरकारला पाठींबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
बुधवारी मुंबईला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होती. त्याबाबत कुठलाही फोन नाही... निरोप नाही... कुठलीही येण्या- जाण्याची व्यवस्था नसताना सोशल मीडियावरील चर्चेतून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने वाहने नाशिकमधून गेली होती. सुमारे ५०० ते ६०० पदाधिकारी- कार्यकर्ते व जागरूक मतदार आले होते. नाशिक-दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील हा मतदार, कार्यकर्ता साहेबांना विश्र्वास देत होता, असे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितले.
श्री. आव्हाड म्हणाले, बंड करणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे सर्व महाराष्ट्र पाहात आहे. त्यांना एक वर्षात काय काय पाहावे लागले हे यांना ते पाहण्यासाठी अल्पकाळच लागेल; अवघ्या पंधरा दिवसांत काय चित्र दिसते, हे आपणा सर्वांनाच दिसेल. त्यामुळे कुठलीही चिंता न करता सच्चा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उद्यापासून पक्षाची बांधणी करणार आहोत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत आज झालेल्या चर्चेनंतर ा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला आघाडी, तसेच विविध आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून झालेली गळती दूर करण्याचे काम केले जाईल. त्यांनतर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून बांधणीप्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे श्री. आव्हाड यांनी सांगितले.
आज माजी आमदार उत्तम भालेराव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी नगरसेवक गजानन शेलार, दत्तात्रय माळोदे, सुरेश सानप, पुरषोत्तम कडलग आदी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.