Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची मोठी अपडेट

Ajit Pawar And Maharashtra Cooperative Bank : जरंडेश्वर कारखाना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कवडीमोल दराने संपादीत केला
ED, Ajit Pawar
ED, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra State Cooperative Bank Scam : महाराष्ट्र राज्य बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते.या आरोपपत्राची विषेश 'पीएमएलए' (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) कोर्टाकडून दखल घेतली आहे. यावेळी जरंडेश्वर एस.एस.के. कारखान्याच्या गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँकांनी २२६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आर्थिक फायद्याासठी कारखान्याची मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण्यांनी कवडीमोल दराने संपादीत केल्याचे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले आहे. (Latest Political Marathi News)

ED, Ajit Pawar
Shinde-Fadnavis-Pawar Government: शिंदे-फडणवीस-पवार सरकार नेमकं काय आहे ? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

अधिक माहितीनुसार, शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने एप्रिलमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. हे आरोपपत्राची आता विषेश 'पीएमएलए' कोर्टाकडून दखल घेतली आहे. यावेळी न्यायाधीश देशपांडे यांनी काही निरीक्षण नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित लोकांना 'समन्स' बजावण्यात आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित काही लोकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'ईडी'च्या आरोपपत्रानुसार या घोटाळ्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतला. त्यांना कवडीमोल दराने त्यांना कारखाना मिळाला. त्यांनी या कारखान्याच्या नावावर पुणे जिल्हा बँकेकडून ८२६ कोटी रुपायंचे कर्ज घेतले. त्यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते. हा पैसा साखर कारखान्याच्या कामासाठी होणे गरजेचे होते. मात्र तो इतर ठिकाणी वापरला गेला. तसेच यातील काही पैसा परदेशातही पाठवला गेला, असे या घोटाळ्याचे स्वरुप आहे.

ED, Ajit Pawar
Nashik Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ; आमदार सुहास कांदेंची ताकद वाढली..ठाकरेंच्या निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश

न्यायाधीश देशपांडे यांनी नोंदवलेले निरीक्षण

आरोपपत्रानुसार महाराष्ट्र शिखर बँकेकडून जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव केला त्यावेळी हा कारखाना मुंबईतील गुरू कमॉडिटीज नावाच्या कंपनीने घेतला. यानंतर या कंपनीने साखर कारखाना दीर्घ काळासाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या कंपनीला दिला. या कंपनीचा मालक स्पार्किंग सॉईल प्रा. लि. ही आहे. तर स्पार्किंग सॉईलमध्ये एकेकाळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संचालक होत्या.

यावेळी न्यायाधिशांनी स्पार्किंग कंपनीकडे लक्ष वेधले. हा कारखाना अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला कसा काय दिला, असा प्रश्न उपस्थित केला. यासह वेळोवेळी महाराष्ट्र शिखर बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिले. मात्र ८० कोटींची थकबाकी असताना कारखान्याचा लिलाव केला. लिलावानंतर मात्र याच कारखान्याच्या नावावर तब्बल ८२६ कोटी रुपये गुरु कमोडिटीज कंपनीला दिले गेले. या सर्व अफरातफरी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना फायदा होण्यासाठी केल्याचे न्यायमूर्ती देशपांडे यांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. यामुळे संबंधित लोकांना 'समन्स' पाठवण्यात आले आहे. त्यास कारखान्याचे 'सीए'चाही समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com