Abhishek Kalamkar : ट्रिपल इंजिन सरकारकडून 'मेगाभरती'च्या नावाखाली युवकांना 'गाजर'च...!

Ahmednagar Politics : ...हे राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र आहे.
Abhishek Kalamkar
Abhishek Kalamkar Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर काही दिवसांपासून अॅक्शन मोडवर आहेत. नगर शहरातील रस्त्यांच्या निधीवरून लोकप्रतिनिधीच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुढे सरकत असतानाच रखडलेल्या नोकरी भरतीवर राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मेगाभरतीच्या नावाखाली ट्रिपल इंजिन सरकार युवकांना गाजर दाखवत आहे, अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली.

राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत रखडलेल्या नोकर भरतीवर निवेदन दिले. राज्याच्या गृह विभागातील 2022-23 मधील अनेक रिक्त पदे आहेत. उमेदवार पोलिस भरतीची तयारी करत आहेत.

Abhishek Kalamkar
Gram Panchayat Election : सरपंच, उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारताना सदस्यांसह गावातून काढली जंगी मिरवणूक!

सामान्य प्रशासनाने तीन मार्च 2023 ला उमेदवारांना दोन वर्षे वयोमर्यादा वाढवून दिली होती. मात्र, 31 डिसेंबरपूर्वी पोलिस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादामुळे अपात्र ठरतील. त्यामुळे 31 डिसेंबर 2023 पूर्वी पोलिस भरतीची जाहिरात काढावी व उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

अभिषेक कळमकर म्हणाले, "राज्यातील प्रशासन दरवेळी मनुष्यबळाची कमतरता सांगते. राज्य सरकारमधील (State Government) प्रत्येक प्रशासकीय विभागाची ही ओरड आहे. पोलिस दलाची परिस्थितीदेखील वेगळी नाही. यावर राज्य सरकारकडून लवकरात लवकर भरती घेऊ, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नाही. भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचे वय निघून गेले, तरी भरतीचे निर्णय होत नाहीत, ही राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र असल्याचेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार फक्त मेगाभरतीचे गाजर दाखवते. प्रत्यक्षात कुठलीही भरती करत नाही. बेरोजगारी मुळे अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी प्रयत्न केले आहेत. रोजगार देऊ असे सांगायचे आणि प्रत्यक्षात युवकांना फक्त आशेला लावायचे काम सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार करत असल्याचा आरोप अभिषेक कळमकर यांनी केला.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे व राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना या गंभीर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनंती केली आहे. ट्रिपल इंजिन सरकारसमोर राज्यातील पोलिस भरती प्रक्रियासंदर्भात आवाज उठवावा, अशी मागणी केल्याची माहिती अभिषेक कळमकर यांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Abhishek Kalamkar
Mhada Pune : पुणे म्हाडाच्या 5863 घरांची सोडत पुढे ढकलली! लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात येणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com