शिवसेनेच्या व्यासपीठावर `राष्ट्रवादी`ची तुफान फटकेबाजी

धरणगाव येथील सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका
NCP leader Gulabrao Devkar
NCP leader Gulabrao DevkarSarkarnama
Published on
Updated on

धरणगाव :‘‘जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांनी (Gulabrao Patil) केवळ भाषणबाजी केली. आम्ही बाप बदलत नाहीत, (We do not change father) शिवसेना व उद्धव साहेबांना (Uddhav Thackrey) कधीही सोडणार नाही, असे म्हणणारे हे एकनिष्ठ कार्यकर्ते खोक्यांपुढे डगमगले आणि उद्धव साहेबांना सोडून गद्दारीचा घरोबा केला’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (NCP) नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे गटावर (Eknath Shinde Group) चौफेर फटकेबाजी केली. (Shivsena Uddhav Thackery party`s Awareness campaignin Jalgaon)

NCP leader Gulabrao Devkar
...आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली!

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा धरणगाव शहरात होती. त्यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. देवकर यांनी श्रीमती अंधारे यांच्या सभेला हजेरी लावली.

NCP leader Gulabrao Devkar
गुलाबराव पाटील, तुमच्यावर फडणवीसांनी कोणती भानामती आहे?

सुरुवातीलाच श्री. देवकर यांनी स्पष्ट केले, की शिवसेनेच्या व्यासपीठावर आम्ही जरा अतिक्रमण केले आहे. पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळून या ठिकाणी हजेरी लावली. कधीही बाप न बदलण्याची भाषा करणाऱ्या आमच्या एकनिष्ठ पालकमंत्र्यांनी पन्नास खोक्यांसाठी आपल्या जबानीला बट्टा लावला, ही जळगाव ग्रामीण मतदार संघातील मतदारांशी घोर प्रतारणा आहे. मंत्रिपद असून देखील विकासाच्या नावाने जिल्ह्यात बोंबाबोंब आहे.

ते म्हणाले, २००९ च्या निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यात धरणगावचा उड्डाणपूल अवघ्या दोन वर्षात करण्याची घोषणा केली. त्यावेळी हे महाशय उड्डाणपुल झाला तर मी देवकर आप्पांचा जाहीर सत्कार करेल, अशी भाषा करत होते. मला दोन वर्षे मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्याच कालावधीत धरणगावचा उड्डाणपूल उभा करून दाखवला. त्याचेही श्रेय घ्यायला यांनी मागेपुढे पाहिले नाही. पण जनता आता दुधखुळी राहिली नाही.’

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील यांनी पाणीपुरवठा खाते मागून घेतले. राज्यभरातील निविदांचे अधिकार आपल्याला मिळावे, अशीही मागणी त्यांनी केली. अजितदादा उद्धवसाहेबांनी विचार करून त्यांना अधिकार दिले आणि तिथूनच निविदेमागचे गौडबंगाल समोर येऊ लागले. ठेकेदारांना कोणत्या अटीवर ठेके दिले जातात, हे सर्वांना माहीत झाले आहे. जिल्ह्याच्या या मंत्र्यांकडे पाणीपुरवठा खाते असूनही त्यांच्यात मतदारसंघातील धरणगावसारख्या मोठ्या शहरात वीस - पंचवीस दिवसांआड पाणी येतं याचा अर्थ काय लावायचा? असा टोलाही त्यांनी हाणला.

या सभेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com