Dada Bhuse News : आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत असतो!

Minister Dada Bhuse says, CM Eknath shinde is very hard worker-दादा भुसे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही १८ ते २० तास काम करतात
Dada Bhuse & Sanjay Raut
Dada Bhuse & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Dada bhuse on Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत चांगले काम करीत आहेत. आजही ते १८ ते वीस तास काम करतात. त्यामुळे आम्ही त्यांना विश्रांती घेत चला, असे सांगत असतो, असे राज्याचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (Dada Bhuse criticized Shivsena leader Sanjay Rout on CM Eknath Shinde issue)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना (Shuvsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिका केली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्र्याबाबत विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्ही देखील त्याच भाषेत उत्तर देऊ असे त्यांनी सुनाावले.

Dada Bhuse & Sanjay Raut
Ravikant Tupkar Vs Raju Shetti: 'स्वाभिमानी' फुटीच्या उंबरठ्यावर ? तुपकरांनी शेट्टींचे आवाहन धुडकावले ; शिस्तपालन समितीसमोर गैरहजर..

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्‍या पत्रकार परीषदेत भुसे यांनी ‘सामना’तील टीकेला प्रत्युउत्तर दिले. संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाताना, चाकरी शरद पवार यांची करतात, अशी टीकादेखील त्‍यांनी केली.

श्री. भुसे म्हणाले, खासदार राऊत यांनी मर्यादा सोडू नये, नाहीतर आम्हीही त्यांना त्याच भाषेत सडेतोड उत्तर देऊ. ते म्हणाले, सध्या सातत्याने राज्‍यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम काहींकडून सुरू आहे. टीका करताना त्यांनी मर्यादा सोडू नका, नाहीतर आम्‍हालाही मर्यादा सोडावी लागेल, अशा शब्‍दात पालकमंत्री भुसे यांनी राऊत यांना खडेबोल सुनावले.

Dada Bhuse & Sanjay Raut
Maharashtra Politics: काँग्रेस फुटणार; सर्वपक्षीयांचे सरकार येणार ? नारायण राणेंचा नवा बॉम्ब

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्‍या संपूर्ण कुटुंबाला पंतप्रधान भेटले. त्यांना शाबासकीची थापही दिली. गृहमंत्री अमित शहा यांच्या घरातदेखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले. मुख्यमंत्री नाराज नाहीत. ते आजही दिवसातील अठरा ते वीस तास काम करतात. किमान पाच -सहा तास झोपेची आवश्‍यकता असल्‍याने आम्‍ही त्‍यांना आराम करण्याचा सल्‍ला आम्ही देत असतो. दोन दिवस आरामासाठी ते शेतात गेले, तेथूनदेखील ते काम करत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com