Mahayuti Politics: विधानसभेला किंग मेकर ठरवलेला भाजप नेता जिल्हा परिषदेला मात्र आमदार दिलीप बनकर थेट भिडणार?

NCP MLA Dilip Bankar may in problems, Yatin Kadam, Amrita Pawar's firm on self-reliance for BJP, Niphad pattern in the ZP-जिल्हा परिषदेत यंदा यतीन कदम आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपचा ‘निफाड पॅटर्न’ चर्चेत
Yatin Kadam & Amruta Pawar
Yatin Kadam & Amruta PawarSarkarnama
Published on
Updated on

Niphad News: विधानसभा निवडणुकीत निफाड मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकला. दिलीप बनकर आमदार झाले. जिल्हा परिषदेला मात्र बनकर यांना महायुतीच्याच सहकाऱ्यांचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीला महायुती एकत्रित सामोरे जाणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर मात्र नेमकी याच्या उलट स्थिती आहे. विशेषता आत्मविश्वास वाढलेले नेते स्वबळाच्या तयारीला लागले आहेत.

नाशिक महापालिकेत महायुतीत ऑल इज वेल नाही. हे वारे जिल्हा परिषदेतही पोहोचले आहेत. निफाड तालुक्यात यतीन कदम आणि अमृता पवार यांनी भाजपची स्वबळाची तयारी सुरू केली असल्याचे कळते. त्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.

Yatin Kadam & Amruta Pawar
Nashik Crime : आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या टोळीवर मोक्का, निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवलेंना मोठा धक्का

यतीन कदम हे ओझर गटातील माजी सदस्य आहेत. यंदा नगरपंचायत झाल्याने त्यांचा ओझर गट अस्तित्वात नाही. अमृता पवार या देवगाव गटाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. या दोन्ही नेत्यांनी येवला आणि निफाड मतदार संघातील आमदारांशी संघर्ष करून एकहाती निवडणूक जिंकली होती.

Yatin Kadam & Amruta Pawar
Bacchu Kadu Politics: नाशिकच्या शेतकरी आंदोलनात बच्चू कडू यांचीही उडी; शेतकऱ्यांचा लढा उभारणार!

सध्या देखील या दोघांच्या विरोधात सत्ताधारी आमदारच डावपेच आखात आहेत. ह्या राजकारणाची चाहूल लागल्याने दोन्ही नेत्यांनी त्याला प्रखर उत्तर देण्याची तयारी केली आहे. तालुक्यातील सर्व दहा गटांमध्ये भाजपने स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात बहुतांशी गटांमध्ये इच्छुक उमेदवार तयारीत आहेत.

भाजपने स्वबळावर जिल्हा परिषदेची निवडणूक करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांना हे मोठे आव्हान आहे. भाजपसह अन्य सहकारी पक्ष स्वबळावराची तयारी करीत असल्याने यंदा हा ‘निफाड पॅटर्न’ चर्चेत आहे.

यतीन कदम हे दिलीप बनकर यांच्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरले होते. गत वर्षीच्या निवडणुकीतही थेट अजित पवार यांनी हस्तक्षेप करून त्यांना विधानसभेसाठी थांबविले होते. त्याचा फायदा आमदार बनकर यांना झाला. आता जिल्हा परिषदेत मात्र किंगमेकर ठरलेले कदम आमदार बनकर यांना थेट भिडण्याची तयारी करीत आहेत.

कार्यकर्त्यांची इच्छा आणि दबाव यामुळे निफाड तालुक्यात भाजप स्वबळावर तयारी करीत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती साठी उमेदवारांचा शोध होत आहे. मात्र पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतील. वरिष्ठ नेते सांगतील तेच अंतिम असेल, असे यतीन कदम यांनी सांगितले.

माजी सदस्य अमृता पवार यांच्या विरोधात स्थानिक आमदारांकडूनच प्रतिस्पर्धी इच्छुकांना ताकद पुरवण्याचे काम होत आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणुकीत उतरावा असा आमचा प्रयत्न असेल, असे अमृता पवार यांनी सांगितले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com