Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पक्षातील फुटीनंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, परराज्यात जाणारे उद्योग, भर्ती प्रक्रियेतील फी प्रश्न आणि ढिसाळ नियोजन, पाणी प्रश्न आदी मुद्यांवर माध्यमातून टीकेची झोड उडवत विरोधकांना फैलावर घेत आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील याच मंत्र्यांकडे विविध प्रश्नांवर गाठीभेटी घेत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या पॅटर्नमुळे राजकीय विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत.
गेल्या दोन दिवसांत रोहित पवार यांनी भाजप (BjP) नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत त्यांच्या समोर विविध प्रश्न मांडले आहेत. कर्जतमधील एकूण 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या 5 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशी विनंती त्यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मंगळवारी भेटून केली.
येत्या 2 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. मात्र, एवढा उशिर न करता त्याआधीच बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. या नंतर बुधवारी (ता. ३०) विखे पटलांना भेट पवार यांनी घेतली. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नाव आहे. आता खऱ्या अर्थाने परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ईथे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
त्वरित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळावी अशी विनंती केली. चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर हे लवकरात लवकर सुरू करावे, अशी देखील विनंती केली. सरकारची मदत मिळेपर्यंत आम्ही खासगी टँकरने जसे आतापर्यंत पाणी देत आहोत तसेच यापुढेही टँकरने नागरिकांना पाणी पोचवत राहू, असे देखील त्यांना सांगितले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.