MLA Sangram Jagtap: नगर शहरात गुन्हेगारी वाढली ? आमदार जगताप पोलिस अधिकाऱ्यांवर बरसले

NCP MLA Sangram Jagtap and Ahmednagar Police: नगर शहरात चोरीच्या, लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापारी भयभीत
MLA Sangram Jagtap
MLA Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नगर शहरात वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापनगर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले. शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांचा धाक राहिला नाही. नगर शहर पोलिस दलातील निम्म्याच्यावर पोलिस कर्मचारी गणवेशात दिसत नाहीत.

पोलिसिंग दिसत नसल्याने नगर शहरात चोरीच्या, लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापारी भयभीत आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करत गुन्हेगारीला रोखण्यास अपयशी ठरल्यास मंगळवारी (ता. 28) अडते बाजारातील डाळ मंडई येथे व्यापाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

नगर शहरातील वाढत्या चोरी, लुटीच्या घटनांवरून आज आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली. ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र चोपडा, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. या बैठकीला कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे हेदेखील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Sangram Jagtap
Ahmednagar News : 'प्रवरे'कडून 8 वर्षे लूट होताना गप्प का ? ऊस दरावरून 'गणेश'च्या अध्यक्षांनी मांडली जुनी आकडेवारी..

नगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आमदार संग्राम जगताप यांनी प्रशांत खैरे यांच्यासमोर एक तास वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. वाढत्या गुन्हेगारींचे दाखले दिले. यावर कारवाई का होत नाही? अशी विचारणा केली. आमदार जगताप म्हणाले, "नगर शहरात दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.

व्यापाऱ्यांना टार्गेट करून लुटले जाते. चोरी आणि लूट करणाऱ्या टोळ्या दिवसाढवळ्या शस्त्र घेऊन फिरतात. गावठी पिस्तूल किंवा इतर अवैध शस्त्र घेऊन दिवसा लुटले जाते. शहरातील काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस टोळके लूटमार करतात. विनानंबरच्या दुचाकीवरून चोर शहर भर फिरतात. असे प्रकार वाढले आहेत."

"पोलिसांचा धाक नाही राहिला, अशी परिस्थिती नगर शहराची कधीच नव्हती. अलीकडच्या काळात व्यापाऱ्यांना टार्गेट करून लुटीचे प्रकार वाढलेत. या गुन्ह्यांची उकल होताना दिसत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना लूटमारीच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते आहे.

व्यापारी भयभीत झालेत. लूट करताना चोर थेट प्राणघातक हल्ला करतात. यातून गुन्हेगारी कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा अंदाज येतो. पोलिसांना मात्र याचे गांभीर्य नाही, असे दिसते. पोलिसांनी लुटीच्या घटना करणाऱ्या मागील टोळक्यांचा बंदोबस्त करावा, " अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

MLA Sangram Jagtap
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर आज तोडगा निघणार? राम शिंदे पुन्हा आंदोलकांना भेटणार

नगर शहरात दिवसाढवळ्या वाढत्या गुन्हेगारींवर पोलिसांचा धाक नाही. नगर शहर पोलिस दलातील पोलिसिंग दिसत नसल्याचेही निरीक्षण आमदार संग्राम जगताप यांनी या वेळी नोंदवले. नगर पोलिस दलातील निम्म्याच्या वर पोलिस हे गणवेशात दिसत नाही. त्यामुळे पोलिसांची जरब राहिलेला नाही. गणवेशात जात असलेल्या पोलिसाचा धाक असतो.

मात्र, ते अलीकडच्या काळात दिसत नाही. चोरीच्या आणि लुटीच्या घटनांची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यावर पोलिसांकडून हद्दीचा वाद घातला जातो. यात बराच वेळ निघून जातो. परिणामी चोर निसटून जातो. विशेष करून कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये हे प्रकार होतात. पोलिसांनी हद्दीचा वाद टाळून चोरांना पकडण्यासाठी आधी ॲक्शन घेतली पाहिजे, अशी ही मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

नगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नगर शहर पोलिस दलाने ठोस भूमिका न घेतल्यास व्यापाऱ्यांसह आपण अडते बाजारमधील डाळ मंडई येथे मंगळवारपासून (ता.28) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करू, असा इशारा या वेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

विनाक्रमांक दुचाकींवर कारवाईपासून ते रात्री विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा. कारवाई वेगाने होण्यासाठी गस्तीपथकाबरोबर अतिरिक्त पोलिस बळ या दोन्ही पोलिस ठाण्यांना पुरवले जाईल. नगर शहरातील कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यांबरोबर भिंगार कॅम्प, एमआयडीसी, नगर तालुका पोलिसांनाही त्यांच्या हद्दीत रात्रीच्या ग्रस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

(Edited By - Ganesh Thombare)

MLA Sangram Jagtap
Milk Price News : दुधाच्या दरात वाढ होणार ? मंत्री राधाकृष्ण विखेंनी बोलावली तातडीची बैठक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com