Kalwan APMC Result : राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी हॅटट्रिक केली!

कळवणला शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व, १८ पैकी १५ जागा जिंकत सत्ता अबाधित
Nitin Pawar
Nitin PawarSarkarnama

Nitin Pawar wins : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. परिवर्तन पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. (NCP MLA Nitin Pawar create hattrick in APMC kalwan election)

आमदार नितीन पवार व माजी सभापती धनंजय पवार यांनी १८ पैकी १५ जागा जिंकत आपला गड शाबूत ठेवला आहे. माजी आमदार जे.पी. गावित, माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीचा हा कल आगामी विधानसभेसाठी सुचक आहे.

Nitin Pawar
Nashik APMC Result : ना महाविकास आघाडी, ना भाजप, मतदारांचा प्रस्थापितांना कौल

कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान होवून ९०.९१ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली. प्रथम सोसायटी गटाची त्यानंतर ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी गटाची मतमोजणी प्रक्रिया पार पाडत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निकाल घोषित करण्यात आला. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणूक निर्णय अधिकारी चिंतामण भोये यांनी निवडणूक निकाल जाहीर करताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी निकालाचे स्वागत केले.

विजयी उमेदवार

सोसायटी गट : बाळासाहेब गांगुर्डे (३०७), सुधाकर खैरनार (३२७), सोमनाथ पवार (२८६), पंढरीनाथ बागूल (२३४ ), दत्तू गायकवाड (२४६), प्रवीण देशमुख (२५८), दिलीप कुवर (२७७) विजयी झाले. महिला राखीव गटातून शेतकरी सुनीता जाधव (३११), रेखा गायकवाड (२७४) विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून बाजार समितीचे माजी सभापती धनंजय पवार (२९५), भटक्या विमुक्त जमाती गटातून बाळासाहेब वराडे (२९४ ) विजयी झाले.

Nitin Pawar
Deola APMC election : भाजप-राष्ट्रावादीची भाऊबंद संपली पण कार्यकर्ते दुरावले?

ग्रामपंचायत गट :

सर्वसाधारण गटातून पाळे खुर्दचे उपसरपंच भरत पाटील (३६२) चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार (३९०) विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती गटातून पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत गवळी (४१५) विजयी झाले. आर्थिक दुर्बल गटातून बाजार समितीचे माजी संचालक शीतलकुमार अहिरे (३७५) विजयी झाले. व्यापारी गटाची निवड प्रक्रिया माघारीमुळे बिनविरोध झाली होती. कळवण मर्चंट बँकेचे अध्यक्ष योगेश महाजन (२५३), योगेश शिंदे (२४३) विजयी झाले. हमाल मापारी गटातून शशिकांत पवार हे अटीतटीच्या लढतीत ( ६३ ) १८ मतांनी विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com