Ahilyanagar NEET case : NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत; 'CBI'ने राहुरीतून एकाला उचलला, कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

CBI has detained Dhananjay Lokhande from Rahuri Ahilyanagar district connection with the NEET Exam 2026 paper leak case : नीट 2026 पेपर फुटीवर तपासात सीबीआयने वेग घेतला असूनल अहिल्यानगरमधून तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar NEET case
Ahilyanagar NEET caseSarkarnama
Published on
Updated on

NEET 2026 paper leak : NEET 2026 पेपर फुटीप्रकरणात तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर काम करत असताना, या प्रकरणाचे धागेदोरे देशभरात पसरल्याचे समोर येत आहे. या पेपर फुटीची महाराष्ट्रातील नाशिकपासून तपासाला सुरवात झाल्यानंतर, त्याची व्याप्ती हरियाणा, राजस्थान, उत्तराखंडपर्यंत पोहोचली आहे.

आता यात अहिल्यानगर जिल्ह्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. राहुरीतील धनंजय जाधव याच्यासह सीबीआयने तिघांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. धनंजय लोखंडे याचे यात नाव समोर आले असले तरी इतर दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.

अहिल्यानगरमधील तिघांना ताब्यात घेत, सीबीआयने (CBI) तपासाला वेग घेतला आहे. ताब्यात घेतलेले तिघे अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआय तपास करत असल्याने या तिघांचा रोल काय होता, याचा खुलासा अजून होऊ शकलेला नाही. परंतु संशयितांना ताब्यात घेतल्याचा माहितीला पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दुजोरा दिला.

NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. नाशिक (Nashik) इथल्या एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. धनंजय निवृत्ती लोखंडे (वय 26) हा मूळचा राहुरी तालुक्यातील रहिवाशी असून तो सध्या पुण्यात वास्तव्यास होता.

Ahilyanagar NEET case
Sex Determination Case : महाराष्ट्र हादरवणारं गर्भलिंग निदान रॅकेट! 12वी शिकलेल्याकडून चाचण्या, गोठ्यापासून धावत्या कारपर्यंत ‘सेटअप’, IMA डॉक्टरसह 12 जण अटकेत, शेकडो गर्भपात

नाशिक इथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर पसार झालेल्या धनंजय लोखंडे याला CBI च्या पथकाने रात्री उशिरा राहुरी इथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संशयित धनंजय लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर या छोट्याशा गावातील रहिवाशी आहे.

Ahilyanagar NEET case
NEET Paper Leak: NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन? नाशिकमध्ये तयार झाली पहिली कॉपी; टेलिग्राम-व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

धनंजय याचे वडील शाळेत लिपिक असून मोठा भाऊ डॉक्टर आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं दवाखाना चालवतो. धनंजय याने दोन वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील मंगळरू इथं आपले B.A.M.S चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पुणे जिल्ह्यातील वाघोली इथं वास्तव्यास होता आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच त्याने प्रॅक्टिस सुरू केली होती.

यासह तो मेडिकल ऍडमिशनसाठी कन्सल्टिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. CBIने नाशिक इथून शुभम खैरनार याला पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय लोखंडे याचे नाव समोर आले. त्यानंतर CBIच्या पथकाने पसार असलेल्या धनंजय याला चौकशीसाठी राहुरी येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

याबाबत धनंजय याच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला. मात्र धनंजय गावाकडे वर्षातून फक्त दोन ते तीन वेळेस यायचा, तो असे काही करेल असं वाटतं वाटत नाही, पेपरफुटी प्रकरणाबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे त्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. परंतु धनंजय लोखंडे याच्याबरोबर अन्य दोन जणांच्या नावाची चर्चा आहे. ही त्यांची नावे अजून समोर आले नाहीत. नाशिक आणि अहिल्यानगरमधील या कारवाईमुळे आता नीट पेपरफुटी प्रकरणाचे जाळे महाराष्ट्रातही खोलवर असलल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com