NCP Vs Shivsena Politics : स्थानिक निवडणुकांपूर्वी तटकरेंचा मास्टर स्ट्रोक! गोगावले-थोरवेंच्या मतदारसंघातच उतरवले कट्टर विरोधक

raigad political clashes between Sunil Tatkare And Bharat Gogawale, Mahendra Thorve : रायगडमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विरोधक म्हणून भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्याकडे पाहिले जाते. पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीपर्यंत येऊन ठेपला आहे.
Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Mahendra Dalvi And Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रायगडमध्ये पालमंत्रीपदावरून तटकरे व गोगावले यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

  2. महेंद्र थोरवे गोगावलेंच्या समर्थनार्थ उतरत असून, तटकरे यांनी त्यांच्या विरोधकांना पक्षात महत्वाची पदं दिली आहेत.

  3. या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Raigad News : रायगडमध्ये सुरू झालेल्या पालमंत्रीपदाचा वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडापर्यंत आला आहे. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्यातील वाद आता टोकापर्यंत गेला आहे. तर गोगावलेंवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम आमदार महेंद्र थोरवे करताना दिसत आहेत. यामुळे गोगावलेंसह थोरवेंचा काटा काढण्यासाठी तटकरे यांनी नवी राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी गोगावलेंसह थोरवेंचे कट्टर विरोधक असणाऱ्या नेत्यांना ताकद देत पक्षात महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला घेरण्याचा डाव तटकरे यांच्याकडून खेळला जात असल्याचे आता बोललं जात आहे. (Sunil Tatkare’s strategic appointments in Raigad ahead of local body elections aimed at challenging Shiv Sena dominance and targeting Bharat Gogawale and Mahendra Thorve)

रायगडच्या पालमंत्रीपदाचा वाद अद्याप काही मिटलेला नाही. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यावरून आमने-सामने आली आहे. दरम्यान तटकरे-गोगावले वादामुळे महायुतीलाही तडे जाता जाता राहिले आहेत. तटकरेंच्या विनाच युती आणि आगामी निवडणुक अशीच घोषणा खासदार तटकरे यांचे कट्टर विरोधक आमदार महेंद्र थोरवे यांनी केली होती. ज्यानंतर आता आगामी स्थानिकला गोगावले यांच्यासह थोरवे यांना त्यांच्याच मतदार संघात अडकवून ठेवण्याची खेळी तटकरे यांनी खेळली आहे. त्यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे विरोधक सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडे प्रदेश सरचिटणिस पदाची जबाबदारी देत त्यांना ताकद देण्याचे काम केलं आहे.

Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Sunil Tatkare On Manoj Jarange : 'मनोज जरांगेंनी हवं ते बोलावं पण....', मारहाणीच्या आरोपावर सुनील तटकरेंनी सुनावलं

तटकरे यांना घेरण्याची संधी जिल्ह्यातील शिवसेना सोडत नाही. नेहमीच तटकरे यांना लक्ष्य करत भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे टीका करताना दिसतात. पण आता तटकरे यांनी आपल्या विरोधकांना त्यांच्याच मतदार संघात विरोधकांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. कर्जतमधील घारे यांच्याकडे रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तर महाडच्या जगताप यांना प्रदेश सरचिटणिस करण्यात आले आहे. हे दोघे ही गोगावले आणि थोरवे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

घारे हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी कर्जत मतदार संघातून मागील विधानसभा शिवसेना (शिंदे) आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना मागच्या दाराने तटकरे यांनी रसद पुरवली होती, असे आजही बोलले जाते. तर घारे यांचा फक्त 5 हजार मतांनी पराभव झाला होता. आता थोरवे यांना खिंडीत रोखण्यासाठी तटकरे यांनी घारे यांच्याकडे रायगड जिल्हाध्यक्ष पद दिले आहे.

हनुमंत जगताप हे महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे ते सख्खे भाऊ असून ते महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे सख्खे काका देखील आहेत. तर त्यांची गोगावले यांच्या महाड मतदार संघात मोठी ताकद असून ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप आणि हनुमंत जगताप यांनी शिवसेना उद्धब बाळासाबेह ठाकरे पक्षाला रामराम केला होता. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता.

दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये तटकरे यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. या फेरबदलातून त्यांनी गोगावलेंसह थोरवेंच्या कट्टर विरोधकांनाच बळ देण्याचे काम केले आहे. यामुळे येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Sunil Tatkare Solapur Tour : सुनील तटकरे जाहीर कार्यक्रमात असं काही बोलले की, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील खुर्ची सोडून जाऊ लागले...

FAQs :

1. रायगडमध्ये पालमंत्रीपदाचा वाद कशामुळे सुरू झाला?
→ सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात राजकीय प्रभाव आणि नेतृत्वाबाबत मतभेद आहेत.

2. महेंद्र थोरवे यांची भूमिका काय आहे?
→ थोरवे हे गोगावलेंच्या बाजूने भूमिका घेत असून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत.

3. तटकरे यांनी नेमकी कोणती राजकीय चाल खेळली?
→ त्यांनी गोगावले आणि थोरवेंचे विरोधक असलेल्या नेत्यांना पक्षात महत्वाची पदं देऊन शिवसेनेला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

4. याचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होईल?
→ महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेला निवडणुकांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.

5. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय आहे?
→ राष्ट्रवादीकडून तटकरे आक्रमक भूमिका घेत असून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बळ वाढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com