Sanjay Raut News; दिल्लीचा गोलमाल चालू देणार नाही!

पन्नास वर्षे रक्ताचे पाणी करून बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली शिवसेना स्वस्थ बसणार नाही.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama

नाशिक : (Nashik) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackerey) यांनी पन्नास, पंचावन्न वर्षे रक्ताचे पाणी करून शिवसेना (Shivsena) वाढवली. आज कोणीतरी दिल्लीहून येते आणि हे तुमचे बाकी सगळे माझे असे सांगते. हा गोलमाल आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना तेव्हढ्याच तीव्रतेने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे) (Uddhav Thackerey) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Shivsena Uddhav Thackerey will very harsh answer to rebels)

MP Sanjay Raut
Shivsena News; गद्दारांनो, शाखांना हात लावाल तर फडशा पाडू!

हे जुलमी सरकार फार काळ चालुच शकत नाही. लवकरच ते कोसळेल. आम्ही सर्व तीथे राहू. शिवसेनेचे निष्ठावंत सगळे त्याचे उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कारण आता आग मस्तकात गेली आहे.

MP Sanjay Raut
Dhule News; महापौरांचा संताप....80 लाख खर्च तरीही शहरात कचरा कसा?

खासदार राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, साडे तीनशे वर्षांपूर्वी मराठी मावळ्यांनी `हर हर महादेव` या गर्जनेने सगळ्या जगाला जाग आणली. आता पुन्हा या गर्जनेची गरज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. या विषयावर मी आक्रमक आहे. मला इतक्या शांततेची सवय नाही, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, आज आमच्यावर, पक्षावर जी वेळ आहे त्या स्थितीत आम्ही शांत कसे बसणार?. इथे आल्यावर तर या विरोधात लढण्याची प्रेरणा आम्हाला मिळेल. आमच्यावर आलेलं संकट दूर झाल की, उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे पुन्हा येऊ. आम्हाला गुवाहाटीला जाण्याची गरज नाही. जादू टोणा करण्याची आणि रेडे कापण्याची देखील गरज नाही.

साडे तीनशे वर्षापूर्वी असचं दिल्लीहून आक्रमण झालं होतं. औरंगजेबाचे आणि अफजल खानाचेही संकट आलं होतं. मात्र हर हर महादेव या गर्जणेने त्यांना पराभूत होऊन परतावे लागले. त्याच शक्तितून आम्ही पुन्हा इतिहास घडवू. हे संकट देखील मराठी जनता परतवून लावेल. सरकार येते, सरकार जाते मात्र आज काहींनी सत्तेत येताच विवेक गमावला आहे. त्याची परिणीती त्यांना भोगावी लागेल.

ते पुढे म्हणाले, राजकारण उन सावल्यांचा खेळ असतो. चांगेल, वाईट दिवस येतात. त्यामुळे आज जी तलवार तुम्ही आमच्यावर चालवत आहात, ती उद्या आमच्या हातात असेल याचं भान ठेवा. हे जुलमी सरकार लवकरच बदलणार आहे. आम्ही सगळे इथे येणार आहोत. मी तुरुंगात हसत हसत भगवा घेऊन गेलो भगवा घेऊन परत आलो. कारण भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. आम्ही घाबरणाऱ्यांची अवलाद नाही. मी पुन्हा येईन, असे मी तीन वेळा बोलणार नाही. जनतेच्या आर्शिवादाने औरंगजेब आणि शाहीस्ते खानाला संपवणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com