Jalgaon News; `हे`दोन दादा जळगावच्या राजकारणात घडवणार नवी समीकरणे?

राजवड (ता. पारोळा) : माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भेट घेतली.
Sahebrao Patil & Shirish Choudhary
Sahebrao Patil & Shirish ChoudharySarkarnama

अमळनेर : (Jalgaon) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील (Sahebrao Patil) आणि शिरीष चौधरी (Shirish Choudhary) या दोन्ही माजी आमदारांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमधून विस्तवही जात नाही, हे सर्वश्रृत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्र आणि राज्याप्रमाणे आपल्याही मतदारसंघात काही उलटफेर, यूती, आघाडीचे समीकरण तर नाही ना? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात घर करून आहे. त्यांची भेट तर्कवितर्कांचा विषय ठरली. (Ex. MLA Shirish Choudhary & Political competitor Sahebrao Patil meet eachother)

Sahebrao Patil & Shirish Choudhary
Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात कृषिभूषण साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी या दोन्ही माजी आमदार परस्परांना नेहमीच पाण्यात पाहतात. त्यांच्या समर्थकांतही वाद-विवाद सुरुच असतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट व शुभेच्छा म्हणजे तिसरा नेता निर्माण होऊ नये याची व्यवस्था तर नाही, अशी चर्चा आहे.

Sahebrao Patil & Shirish Choudhary
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

पालिकेच्या कार्यकाळ संपल्यानंतर कृषिभूषण पाटील यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला आहे. अमळनेर मतदारसंघातील सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांचा आता फारसा सहभाग दिसून येत नाही. ते कधी शिंदे गटात तर कधी भाजपत जाणार अशाही वावड्या उठतात. असो. दरम्यान, पाटील आणि चौधरी यांच्यामध्ये नेहमीच कुरघोडीचे आणि श्रेयवादाचे राजकारण पाहावयास मिळाले आहे.

चौधरी हे बाहेरील जिल्ह्यातले आहेत हा पाटलांचा प्रचाराचा मुद्दा होता. त्यांच्या व्यवसायावरूनही त्यांना बरेच टार्गेट करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत चौधरींचा ठरवून पाडाव करण्यात आला होता. तर चौधरींनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र करण्याचा मुद्दा मंत्रालयातून न्यायालयापर्यंत नेत पाटलांच्या डोक्यावर पाच वर्ष सतत टांगती तलवार कायम ठेवली होती. त्यामुळे पाटलांना सत्ता वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती.

थोडक्यात म्हणजे या दोन्ही दांदांमधून विस्तवही जात नव्हता. असे असताना त्यांची झालेली भेट स्वाभाविकच संशोधनाचा विषय आहे. आगामी सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत. आमदार अनिल पाटील आणि कृषिभूषण पाटील यांच्यातही सबकूछ आलबेल असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या भेटीचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून जो- तो विचार करत तर्कवितर्क लढवत आहे. दोघं दादांमध्ये दीर्घवेळ चर्चा झाली. मात्र, चर्चेचा विषय काय हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवल्याने गौडबंगाल वाढले आहे.

कृषिभूषण पाटील यांची तब्येत मागे ठिक नसल्याचे समजले होते. त्यांच्या ख्यालीखुशालीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजवड येथे मी त्यांची भेट घेतली. तुमची गरज असून, पुन्हा सक्रिय व्हा, अशी आर्जव मी त्यांना केली.

- शिरीष चौधरी, माजी आमदार, अमळनेर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com