BLO Duty Refusal Case Maharashtra: BLO ड्युटीला दांडी; तहसीलदारांनी दोन शिक्षकांवर ठोकला गुन्हा

BLO duty refusal case Maharashtra teachers: नेवासा इथं बीएलओ नियुक्ती करण्यात आलेल्या दोन शिक्षकांनी कामास नकार दिल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
Newasa BLO teachers case
Newasa BLO teachers caseSarkarnama
Published on
Updated on

Newasa BLO teachers case : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एक एप्रिलापासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यातच जनगणनेचं देखील काम सुरू होत. बीएलओ म्हणून नियुक्ती देऊन देखील शिक्षक कर्तव्यावर हजर होत नसल्याचं समोर येत आहे.

नेवासा इथल्या दोन शिक्षकांनी बीएलओ म्हणून कर्तव्यास नकार दिल्याने त्यांच्याविरोधात तहसीलदारांनी गुन्हा नोंदवल्याने खळबळ उडाली आहे. या कायदेशीर कारवाईमुळे शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राज्यात मतदार (Voter) याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासह जनगणनेचं काम सुरू होत आहे. या सर्व कामांवर शिक्षक, प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्याने अनेक शिक्षकांनी, प्राध्यापकांनी या कामाला विरोध दर्शवला आहे. काहींनी काम करण्यास थेट नकार दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नेवासे विधानसभा मतदारसंघातील सोनई आणि पिंपरी शहाली इथले केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केलेल्या माध्यमिक आणि सहशिक्षकाने विरोध दर्शवला. या दोन्ही शिक्षकांवर (Teacher) राष्ट्रीय कर्तव्यास विरोध केल्याने त्यांच्याविरोधात तहसीलदार डाॅ. संजय बिरादार यांनी गुन्हा नोंदवला. नेवासे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Newasa BLO teachers case
Fake Disability Certificate Scam : दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरण तापलं; 20 शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार, झेडपी फौजदारी करणार?

नेवासे विधानसभा मतदारसंघात विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमात मतदार यादीचे अद्ययावत व मतदार मॅपिंगचे काम म्हणून सोनई इथल्या आदर्श विद्यालयातील माध्यमिक शिक्षक मेघराज नारायण तुवर आणि पिंपरी शहाली शहालीबाबा विद्यालयातील सहशिक्षक अंबादास रामराव जाधव यांच्याकडे देण्यात आले होते. जबाबदारी देऊनही कामाची सुरुवात केली नसल्याने दोघास नोटीस बजावण्यात आली. मात्र, दोन्ही शिक्षकांनी स्पष्टपणे काम करण्यास नकार दिला.

Newasa BLO teachers case
Fake Disability Certificate : धास्ती वाढली, बनावट दिव्यांग प्रकरण तापलं! महसूल विभागातील 56 कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई

यानंतर तहसीलदार यांच्या सूचनेनंतर दोन्ही गावांतील तलाठ्यांनी सोनई मतदान केंद्र 149 आणि पिंपरी शहाली मतदान केंद्र 258 इथं जाऊन पंचनामा केला. संबंधित अहवाल दिल्यानंतर तहसीलदार डाॅ. बिरादार यांनी स्वतः नेवासा पोलिसांकडे या दोघा शिक्षकांविषयी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राध्यापकाचा मृत्यू

दरम्यान, अहिल्यानगरच्या रोटेवाडी इथले प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (वय 40) यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी मतदार विशेष पुनर्निरीक्षणासंदर्भात अचानक बोलवलेल्या बैठकीला जाता अपघाती निधन झाले. मतदार शोधण्याच्या कामाच्या दडपणात हा अपघात झाल्याचा शिक्षकांनी आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे प्राध्यापकांमध्ये संतापाची लाट आहे. यातच नेवासा इथल्या दोन शिक्षकांवर तहसीलदारांनी गुन्हा नोंदवल्याने या संतापात अधिक भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com