Fake Disability Certificate : धास्ती वाढली, बनावट दिव्यांग प्रकरण तापलं! महसूल विभागातील 56 कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई

Verification ordered by Secretary Tukaram Mundhe raises suspicion over disability reports of 56 employees in the Ahilyanagar revenue department : राज्य दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशाप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या महसूल विभागातील दिव्यागं कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू आहे.
Ahilyanagar revenue department
Ahilyanagar revenue departmentSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Revenue Department : अहिल्यानगर जिल्हा परिषदेत दिव्यांगत्वाची टक्केवारी कमी आढळल्याने 15 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केली. तसेच 8 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेतील 41 व महसूल (Revenue) विभागातीलही 56 कर्मचाऱ्यांची दिव्यांग पडताळणी तपासणी पूर्ण झाली आहे. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे दोन्ही विभागांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सरकारी सेवेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी करण्याचे निर्देश गेल्या वर्षी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांनी दिले. यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 87 विभागांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिव्यांग पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबतच्या माहितीचा अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे 20 जानेवारी 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, अनेक विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नऊ मार्च रोजी पुन्हा संबंधित सर्व विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्मरणपत्र देत पडताळणी तपासणीबाबत सूचना केल्या, तसेच याबाबतची माहिती अद्याप न दिल्याने नाराजी व्यक्त करत दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अन्वये प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा विभागांना दिला आहे.

Ahilyanagar revenue department
Fake Disability Certificate Scam : दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरण तापलं; 20 शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार, झेडपी फौजदारी करणार?

जिल्हा परिषदेंतर्गत सुमारे 545 दिव्यांग कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 180 कर्मचाऱ्यांची यादी पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली होती. त्यातील 18 कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाचा टक्का 40 टक्क्यांपेक्षा कमी आढळले. त्यात आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे, तसेच 15 जणांचे निलंबन केले आहे.

Ahilyanagar revenue department
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या आदेशाने सांगली 'ZP' हादरली! 13 शिक्षकासह एक कर्मचारी निलंबित; दिव्यांग प्रमाणपत्राबाबत "नो एक्सक्यूज"

आरोग्य विभागाचा आदेश

41 अल्पदृष्टी व कर्णबधिर कर्मचाऱ्यांची नाशिक इथं पडताळणी तपासणी पूर्ण झाली आहे. त्यांचा अहवालही प्रतीक्षेत आहे, तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना ज्या जिल्हा रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्या रुग्णालयामार्फत पडताळणी करू नये, असा नवीन सरकारी आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे.

नाशिक अपिलीय मंडळाकडे तपासणी

यामुळे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळविले आहे, त्या कर्मचाऱ्यांची पडताळणी आता अहिल्यानगरला न होता या कर्मचाऱ्यांना आता नाशिक इथल्या अपिलीय मंडळाकडे जावे लागणार आहे.

पगाराची वसुलीचं काय?

जिल्हा परिषदेने 15 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांकडून पगाराची वसुली केली जाईल का, असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com