Nida Khan : नाशिक SIT'ची मुंब्य्रात फिल्मीस्टाइल धडक, भनक लागताच निदा खान पसार ; पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली पण..

Nashik TCS Conversion Case : निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तिच्या मागावर आहे. परंतु अद्यापही ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिच्या पतीला ताब्यात घेऊन पथकाने तीची चौकशी केली.
Nida Khan
Nida KhanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेली निदा खान गेल्या २२ दिवसांपासून फरार आहे. शोध घेत असताना निदा खान ही तिच्या सासरी मुंब्रा परिसरात पतीसह राहत असल्याची बाब समोर येताच नाशिक पोलिसांचे एसआयटी पथक मुंब्रा येथे दाखल झाले.

एसआयटी पथकाने शुक्रवारी (दि. १७) सकाळी तिच्या घरी साध्या वेशात फिल्मीस्टाइल रेकी करत धाड टाकली. दुसरेच कुणाचे तरी नाव घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नाशिक एसआयटी पथकातील तीन कर्मचारी मोईन खानच्या घरी धडकले. कुणालाही संशय येऊ नये व सावध होऊ नये म्हणून एसआयटीच्या पथकाने एक किलोमीटरपर्यंत आपले वाहन पार्क करून तेथून पायीच मोईन खानचे घरी धडक दिली. मात्र तेव्हा निदा खान व तिचा पती मोईन खान दोघेही तिथे आढळले नाही.

एसआयटी पथक आपल्यापर्यंत पोहोचणार याची चाहूल लागताच निदा आधीच तेथून पसार झाली होती. तर तिचा पती मोईन खान हा कामावर गेल्याची माहिती मिळाली. पथकाने तो काम करीत असलेल्या कंपनीतून त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी नाशिक गुन्हे शाखेने मुंब्रा पोलिस ठाण्यात मोईन खानला आणले. मोईन याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन फरार निदा खानबाबत माहिती विचारली.

Nida Khan
Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान गरोदर, कुटुंबियांचा खळबळजनक दावा ; अटकपूर्व जामीन मिळणार का?

मोईनची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी केली. चौकशीत तिच्या माहेरचे नाव निदा एजाज खान, तर सासरचे निदा मोईन नविद खान असे निदाचे पूर्ण नाव असल्याचे समोर आले. पत्नी निदा एका नातेवाइकाच्या घरी गेली असल्याचे पती मोईन ने सांगितले. परंतु जेव्हा पोलिस पथक नातेवाइकाच्या घरी पोहोचले, तेव्हा घर बंद होतं. शिवाय, आरोपी आणि तिच्या नातेवाईक दोघांचेही मोबाइल फोन बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिच्या पतीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही मुळची नाशिकची रहिवासी असून टीसीएस कंपनीत कामाला होती. तिचा पती मुंब्रा येथे एका कंपनीत काम करतो. निदा खानने काही दिवसांपूर्वीच आपली बदली मुंबई येथे करुन घेतली होती. पती मोईन खानसोबत ती मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. मात्र आता तिला आता कंपनीने कामावरुन काढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com