Sispe Economic Scam : राहुल काळोखेच्या अटकेसाठी काय केले? नीलेश लंकेंनी थेट दिल्लीतून मांडला घटनाक्रम

Nilesh Lanke claims sustained efforts led to Rahul Kalokhe arrest in the Sispe scam : दुबईतील माहिती संकलन, इंटरपोल प्रक्रिया, अमित शाह यांची भेट आणि तपास यंत्रणांशी समन्वयाबाबत लंके यांचे दावे.
Sispe Economic Scam
Sispe Economic ScamSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke Sispe Scam : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित सिस्पे आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल शामराव काळोखे याच्या अटकेमागे आपण आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्रयत्न असल्याचा दावा खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.

शुक्रवारी महाराष्ट्र भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणातील आपल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती दिली.

खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले की, सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

सप्टेंबर 2025 मध्ये राहुल काळोखे दुबईमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांची एक टीम तेथे पाठवली. या टीमने आरोपीचे वास्तव्य, व्यवसाय, ट्रेड लायसन्स, बँक खात्यांशी संबंधित माहिती, एमिरेट आयडी तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे मिळवली. पुढे ही सर्व माहिती तत्कालीन पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयामार्फत तपास यंत्रणांना उपलब्ध करून दिल्याचे लंके यांनी सांगितले.

Sispe Economic Scam
Abhijeet Dipke BJP Offer Allegation : 'भाजपकडून ऑफर, नकार दिल्यास धमकी' दिपकेंचा दावा; 'नावं जाहीर करा' म्हणत राधाकृष्ण विखेंचे आव्हान

पाठपुराव्याचा भाग म्हणून 9 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आरोपीविरोधात इंटरपोलमार्फत कारवाई करण्याची तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवून प्रकरणाचा पाठपुरावा केला असेही त्यांनी म्हटले.

Sispe Economic Scam
Amol Khatal Affidavit Case : एकनाथ शिंदेंच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा धक्का; अमोल खताळांविरोधातील कायदेशीर खटल्याचा मार्ग मोकळा

इंटरपोलची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राहुल काळोखेने दुबईहून बहरीन आणि त्यानंतर फिजी येथे आश्रय घेतल्याची माहिती मिळाली. विविध यंत्रणांमधील समन्वयामुळे अखेर त्याला अटक करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

खासदार लंकेंकडे महत्त्वाचे दस्ताऐवज

पत्रकार परिषदेत लंके यांनी आरोपींच्या कंपन्यांचे ट्रेड लायसन्स, व्यवसाय परवाने, बँक व्यवहारांशी संबंधित माहिती, वास्तव्याचे पुरावे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. योग्य वेळी हे पुरावे सार्वजनिक केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रेयवादापेक्षा फरारीला पकडणे गरजेचे होते

सिस्पे प्रकरणातील पाठपुराव्याचे श्रेय घेण्याच्या चर्चेबाबत विचारले असता, "सार्वजनिक वक्तव्ये आणि प्रत्यक्ष काम यात फरक असतो. श्रेयवादापेक्षा फरार आरोपींना अटक होणे आणि पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळणे अधिक महत्त्वाचे आहे," असे लंके म्हणाले.

गुंतवणूकदारांचे पैसे परत करा

तसेच, आरोपींना अटक होणे ही केवळ प्रक्रियेची सुरुवात असून, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अन्य तपास यंत्रणांनी आरोपींच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. जप्त होणाऱ्या मालमत्तांमधून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com