Nilesh Lanke News : नीलेश लंके असे का म्हणाले, "कुंपणच शेण खातयं, लोकशाही चोरीचा प्रयत्न होतोय..."

Lok Sabha Election 2024 Voting : नगरच्या जिल्हा प्रशासनाने कडेकोड बंदोबस्तात ठेवत त्रिस्तरीय सुरक्षा पुरवली आहे. असे असून देखील कडक बंदोबस्त भेदून एक व्यक्ती ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामापर्यंत जवळ गेला आहे.
Nilesh Lanke
Nilesh Lankesarkarnama

Nilesh Lanke V/S Sujay Vikhe : लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात (Nagar South Constituency) 13 मे रोजी मतदान झाले. मतदान यंत्र ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला नगरच्या जिल्हा प्रशासनाने कडेकोड बंदोबस्तात ठेवत त्रिस्तरीय सुरक्षा पुरवली आहे. असे असून देखील कडक बंदोबस्त भेदून एक जण ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामापर्यंत जवळ गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यावर संरक्षणव्यवस्थेला थोडे उठा. कुंपणच आता शेण खातयं. लोकशाही चोरीचा प्रयत्न होतोय, असे म्हणत नीलेश लंकेंनी प्रशासनाचे वाभाडे काढले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात थेट लढत आहे. ही लढत चुरशी आहे. दोन्ही उमेदवाराकडून निवडणुकीत बरेच उट्टे काढले गेले. धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, अशी लढत रंगवली गेली. मतदानाच्या दिवशी तर संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात तणाव होता.

मतदान झाल्यानंतर मतपेट्या ईव्हीएम मशीन जिल्हा प्रशासनाने गोदामामध्ये ठेवल्या आहेत. या स्ट्राँग नगर जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था नेमली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली हा संपूर्ण परिसर आहे. असे असले तरी उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी ईव्हीएम मशीन गोदामामध्ये गेल्यापासून तिथे उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये जिल्हा प्रशासनाबरोबर तळ ठोकून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Nanded Loksabha Constituency: 'नांदेड'मध्ये आता 'वसंत'! अमित देशमुखांचा दावा खरा ठरणार का?

नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी तीन शिफ्टमध्ये या स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच्या स्क्रिनसमोर बसतात. स्टाँग रूममध्ये थोडीजरी हालचाल झाल्यास हे पदाधिकारी माजी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयाला रिपोर्टिंग करतात. अशीच संशयास्पद हालचाल काल ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवलेल्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. ही हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर बसलेल्या नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी टिपली असून, याबाबत जिल्हा प्रशासनाला देखील कळवले आहे. त्रिस्तरीय सुरक्षा भेदून अनोळखी व्यक्ती गोदामापर्यंत गेल्याने ती व्यक्ती कोण? तिथे कशी गेली? तिथे जाऊन काय केले? सुरक्षा व्यवस्था काय करत होती? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

माजी आमदार नीलेश लंके यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी ट्विट करत संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय, असे म्हणत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामापर्यंत एक व्यक्ती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदून गेला आहे. सीसीटीव्हीमध्ये (CCTV) बिघाड करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार माझ्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला.

माझे सहकारी हा व्यक्ती पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेण खातय... लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असे ट्विटमध्ये करत नीलेश लंकेंनी म्हटले आहे. Nilesh Lanka objected to the manner in which an unknown person went near the godown where the EVM machine was kept

Nilesh Lanke
Sanjay Jadhav News : '...म्हणून मला जातीयवादाचा फायदा झाला', ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्याने नवा वाद!

ती व्यक्ती सीसीटीव्ही पुरवठादार : जिल्हा प्रशासन

दरम्यान, या सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओमधील व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे. या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही आणि आनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे. त्यामुळे त्या व्हिडिओसंदर्भात कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com