Jayant Patil Big Statement : 'येत्या महिन्याभरात दिल्लीत मोठी राजकीय उलाढाल...'; शरद पवारांचा थेट जयंत पाटलांना फोन

Shetkari Kamgar Paksha Adhiveshan Pandharpur : शेतकरी कामगार पक्षाचं 19 वे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारी (ता.2) पंढरपूर येथे सुरू झाले .या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना बोलावण्यात आले होते. मात्र...
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा धक्कादायक पराभव झाला होता. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. पण त्यांनी मविआची साथ सोडली नव्हती. आता जयंत पाटलांनी मोठा दावा करतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचं 19 वे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारी (ता.2) पंढरपूर येथे सुरू झाले .या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना बोलावण्यात आले होते. मात्र, ते या अधिवेशनाला आलेच नाही. त्यामुळे त्यांनी शेकापच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवले की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

शरद पवारांच्या न येण्यामागचं कारण सांगतानाच शेकापच्या जयंत पाटलांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होत असून त्यामुळे मी येऊ शकत नसल्याचं फोनद्वारे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दिल्लीत मोठ्या घडामोडी नेमक्या काय घडणार आहेत याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहेत.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी फोन करून दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरू असल्याचे सांगितले होते. या महिन्यात ती घडणार असल्यामुळे मला शेकापच्या अधिवेशनाला यायला जमणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं.

Jayant Patil
BJP Vs Shivsena UBT : राऊतांच्या टीकेचा हिशेब चुकता; भाजपच्या महिला नेत्यानं 'मविआ'च्या काळातील 'त्या' घटनांचा पाढाच वाचला

यावेळी आपण त्यांना दिल्लीतलं सरकार पाडा आणि मग या.आम्ही तुमचे स्वागत करू अशा शुभेच्छा दिल्या असंही जयंत पाटील म्हणाले. या अधिवेशनास शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

चार महिन्यांतच केंद्रातील सरकार बदलणार...

केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे.त्यानंतर दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील. मी इंडिया आघाडीचा सदस्य आहे म्हणून सांगतोय, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यांचा या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Jayant Patil
Video Devendra Fadnavis News : महायुती सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; विजबिलाबाबत ऊर्जामंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com