Shivsena News : ‘निफाड’ च्या १०५ कोटींवरून ठाकरे, शिंदे गटात जुंपण्याची चिन्हे!

Niphad Sugar Factory - माजी आमदार अनिल कदम यांनी कामगारांच्या प्रश्नावर न्यायालयीन लढाईचा इशारा दिला आहे.
Anil Kadam & Hemant Godse
Anil Kadam & Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Niphad Latest News : शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची कंपनी सध्या निफाड साखर कारखाना चालवते. मात्र, कामगारांच्या प्रश्नावर येथे आंदोलन सुरू आहे. त्यात माजी आमदार अनिल कदम यांनी कामगारांना पाठिंबा देत त्यांची लढाई लढण्याचे जाहीर केले आहे. (Shivsena`s Ex MLA supports Niphad sugar employees for there deemands)

निफाड (Niphad) साखर कारखान्याच्या कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू आहे. त्यात शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) आणि खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यात राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Anil Kadam & Hemant Godse
Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या मदतीला भाजपचे मित्र, अजित पवार गटाचे कोणी दिसेना!

रखडलेले वेतन लवकर द्यावे

या कारखान्याच्या जागेवर केंद्र सरकारच्या पुढाकाराने ड्रायपोर्ट उभे राहणार आहे. या जागेसाठी सरकारने १०५ कोटी रुपये दिले आहेत. त्यावर कामगारांनीदेखील हक्क सांगितला आहे. हा निधी जिल्हा बॅंकेने घेतल्याने त्यातील काही निधीतून कामगारांची देणी भागवावीत. रखडलेले वेतन द्यावे, या प्रश्नावर कामगार संघटनेने आंदोलन सुरू केले होते.

यासंदर्भात कारखान्याच्या भाडेपट्ट्याच्या करारात शेतकरी व कामगारांच्या हितसंबंधाचा कोणताही विचार केलेला नाही. ड्रायपोर्टच्या माध्यमातून मिळणारी १०५ कोटींची रक्कम प्राप्त होणे शाश्वत असताना, याचा विचार न करता २५ वर्षांची दीर्घ मुदत भाडेपट्ट्यासाठी निश्चित केली आहे. त्यामुळे कराराची पुनर्रचना करण्यासाठी न्यायालयीन लढाई करावी लागेल, असा इशारा माजी आमदार कदम यांनी दिला आहे.

निफाड साखर कामगार संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी व कामगारांचा मेळावा झाला. २६ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण माजी आमदार कदम यांच्यासह ज्येष्ठ सभासदांच्या आग्रहावरून मागे घेण्यात आले. या वेळी न्यायालयीन लढाईसाठी कायदे तज्ज्ञांसह सर्व गोष्टींसाठी मदत करण्याचे आश्वासन माजी आमदार कदम यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्यात राजकीय आणि न्यायालयीन लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.

Anil Kadam & Hemant Godse
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील आता बराक ओबामा, मोदींच्या पंक्तीत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com