Eknath Khadse Politics: मुक्ताईनगर मतदारसंघासाठी भाजप आक्रमक, शिंदे गटाची केली कोंडी!

Muktainagar Assembly constituency: आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडला जाण्याची शक्यता आहे.
Adv Rohini Khadse & Chandrakant Patil
Adv Rohini Khadse & Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News: मुक्ताईनगर मतदारसंघ आणि भाजप हे एक समीकरण आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा हा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळेच भाजप आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते सातत्याने महायुती बरोबर राहिले आहेत. अपक्ष आमदार असूनही त्यांचे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सोबतीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात आक्रमक राजकारण करीत होते.

मुक्ताईनगरमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात विरोधकांचा किल्ला लढविण्याचे काम आमदार पाटील यांनी केले. आमदार पाटील हे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून आले होते.

आमदार पाटील यांनी भाजपच्या अॅड रोहिणी खडसे यांचा दोन हजार शंभर मतांनी निसटता पराभव केला होता. आमदार पाटील हे मूलतः शिवसेनेचे आहेत. खडसे विरोधकांची मोट बांधून भाजपच्या मदतीने त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केल्याचे बोलले जाते.

Adv Rohini Khadse & Chandrakant Patil
Dr Rahul Aher Politics: आमदार राहुल आहेर समर्थक नाराज, आज फडणवीस यांना भेटणार.

या पार्श्वभूमीवर ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला तो मतदारसंघ सोडण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. त्यानुसार जळगाव मध्ये शिवसेनेच्या चार विद्यमान आमदारांसह मुक्ताईनगर हा मतदारसंघ आमदार पाटील यांना सोडण्यात आला आहे.

या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुक्ताईनगर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा आहे. हा मतदारसंघ जिंकणे भाजपला सोपे आहे.

भाजपची यंत्रणा अत्यंत कार्यक्षम आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडू नये. गरज पडल्यास अपक्ष आमदार पाटील यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात येऊन उमेदवारी द्यावी, असाही एक पर्याय ठेवण्यात आला आहे.

Adv Rohini Khadse & Chandrakant Patil
Seema Hire Politics: भाजप इच्छुक एकवटले, पश्चिम मधून नवीन चेहरा देण्याची मागणी!

त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघावरून भाजप कार्यकर्ते अक्रमक असल्याने शिवसेना शिंदे गटाची देखील कोंडी झाली आहे. या मतदारसंघात आता भाजप आक्रमक झाल्याने पक्षाच्या नेत्यांना महायुतीतील एकोपा कायम ठेवण्यासाठी नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल.

एकंदरच महायुतीमध्ये शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाटा समावेष झाला आहे. त्यामुळे हे तीन पक्ष जागावाटपात वाटेकरी झाले आहेत. त्यात ज्या जिल्ह्यात भाजपचा प्रभाव आहे, तेथे भाजपला फटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com