Tapovan Protest : नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले

Nitesh Rane On Tapovan Tree Protest : भाजपमंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त एक्सपोस्ट केल्याने पर्यावरणप्रेमी संतापले आहे. राणे यांनी थेड तपोवनातील वृक्ष व बकरी ईदच्या बकरीची तुलना केली आहे.
Nitesh Rane On Tapovan Tree Protest
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी व नाशिककरांचे आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या एक्सपोस्टमुळे पर्यावरणप्रेमी संतापले आहे. तपोवन मधल्या वृक्ष थोडची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? असा सवाला नितेश राणेंनी उपस्थितीत केल्याने पर्यावरण प्रेमी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहे.

नितेश राणे यांच्यावर आम्हाला किव येते. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक तरी कळतो का? अरे बाबा हे वृक्ष वृषीतुल्य आहे. झाडे ऑक्सिजन देतात व जीवन फुलवितात, माणसं जगवतात. बकरी आणि झाडांचा विषय एकत्र करुन राणे विषय भरकटवत आहे असं नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी म्हटलं आहे. बकरी आणि झाडांचा संबंध आहे का?... यांच्या डोक्यात कोंबडी, बकऱ्याच भरल्या आहेत अशी टीका पर्यावरणप्रेमींनी नितेश राणेंवर केली.

Nitesh Rane On Tapovan Tree Protest
Tapovan Tree Cutting : नाशिकच्या दोन्ही विरोधी खासदारांचे कुणी ऐकेल का? तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी दिल्लीच्या दरबारात खटपट

सयाजी शिदेंनी बोलणं टाळल...

दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही. असं म्हणत त्यांनी राणेंवर बोलणं टाळलं. याउलट ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

Nitesh Rane On Tapovan Tree Protest
Anjali Damania : नाशिकच्या तपोवनात अंजली दमानियांची एण्ट्री, पहिला घाव गिरीश महाजनांवर

दरम्यान नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपले मंत्रिपद आणि आपले राजकारण टिकणे यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाड तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे असं लोंढे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com