Uddhav Thackeray Politics: भाजपचा असाही गेम प्लॅन; पूर्वाश्रमीचे शिवसेना नेत्यांचे परस्परांवरच हल्ले!

Political maneuvering by BJP leaders, fighting between former Shiv Sena leaders, Uddhav Thackeray's regret-भाजपने राजकीय गेम प्लॅन...शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांक़डून परस्परांवरच होणाऱ्या शरसंधान, लाभ मात्र भाजपला
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप मात्र कुंपणावरून खेळ पाहण्यात व्यस्त आहे.

राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुती पक्षातच परस्परांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपसाठी काम करणाऱ्या या नेत्यांकडून एकमेकांचे राजकीय हिशेब चुकते केले जात आहे. त्यात फायदा भाजपचा आणि नुकसान नुकतेच भाजपवासी झालेल्या या नेत्यांचे अशी स्थिती आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच काही सहकाऱ्यांकडे ही सल व्यक्त केली. भाजपकडून निवडणुकांसाठी हा वेगळ्याच गेम प्लॅन सुरू आहे. त्यात भाजप या सर्व वादातून अलिप्त राहून आनंद घेत असल्याचे चित्र आहे.

Uddhav-Thackeray
Sharad Pawar NCP : शरद पवारांचा झुंजार नेता हरपला! माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

नवी मुंबईत गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात परस्परांचे राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. त्यांचा उद्देश महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व टिकविण्याचा आहे.

Uddhav-Thackeray
Mahayuti Politics: 'संकटमोचका'च्या जळगावमध्येच महायुतीला अव्हेरले; एकनाथ शिंदेच्या आमदाराने युतीची चर्चाही फेटाळली!

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आता ते एकमेकांना आणि शिवसेनेला टार्गेट करीत आहे. त्यात कोणीही पराभूत झाला आणि कोणीही जिंकला तरी अंतिमता भाजपलाच राजकीय फायदा होईल.

अशीच स्थिती माजी मंत्री रामदास कदम, मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री नितेश राणे या नेत्यांची देखील आहे. हे सर्व नेते सातत्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर तसेच आपल्याच सहकाऱ्यांवर आक्रमक शैलीत आरोप करतात. यामध्ये टोकाचे धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण देखील होत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका शिवसेनेतून बाहेर पडलेले नेतेच पार पाडत आहेत. यातील बहुतांश नेते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांकडून सुरू असलेले राजकारण भाजपलाच लाभदायी ठरणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील ही सल व्यक्त केली. शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते एकमेकांचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचेच नुकसान जाणते आणि अजाणतेपणे करीत आहे. त्यात फायदा मात्र भाजपचा आणि नुकसान सगळे या मंत्र्यांचे आणि शिवसेनेचे अशी स्थिती आहे. त्यामुळेच तो चर्चेचा विषय आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com