NCP on Dhule city BJP : गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शहरासाठी काहीही करता आलेले नाही. ते स्वतःच्या विकासातच मग्न होते. हे नगरसेवक स्वतःच पक्षाच्या कारभारावर टीका करीत आहेत. त्यामुळे या पक्षाचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष केलास चौधरी यांनी केला. (Ruling BJP of Dhule corporation did not a single devolopment work)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे शहर-जिल्हाध्यक्षाचा (Dhule) पदभार स्वीकारला. कैलास चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) कारभाराचे वाभाडे काढले.
त्यांनी भाजपवर कठोर टीका केली. ते म्हणाले, शहरात नगरसेवक हा शब्दच अस्तित्वात नाही. नगरसेवकांनी जनतेच्या भावनांचा अनादर केला आहे. त्यामुळे जुने नगरसेवक निवडून येणार नाहीत.
सत्ताधारी भाजपकडून ठोस असे काम झालेले नाही. रस्त्यांची दयनीय स्थिती आहे. धुळेकरांना आठ ते दहा दिवस पाणी मिळत नाही. यापूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना चांगले काम करत दोन-तीन दिवसांआड पाणी दिले जात होते.
महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवत राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. मतदारांनी सत्ता दिल्यास रोज दोन तास पाणीपुरवठा केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने शहरात पक्ष पोरका झाला. या स्थितीत प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार (पवार गट) यांनी शहरात पक्षाला उभारी देण्याचे कार्य सुरू केले.
येथील राष्ट्रवादी भवन कुणाच्या ताब्यात आहे, या भानगडीत मी नाही पडणार. त्यापेक्षा जनहिताच्या कामांवर भर राहील, असे चौधरी म्हणाले. या वेळी कुणाल पवार, सुरेश अहिरे, राजेंद्र चितोडकर, एजाज शेख, दानिश पिंजारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.