OBC Reservation : 'एल्गार' मेळाव्यासाठी छगन भुजबळांची नाशिकची टीमही नगरच्या मैदानात!

Chhagan Bhujbal Ahmednagar OBC Melava : तब्बल दोन लाख ओबीसी बांधव मेळव्यासाठी येणार असल्याचा समता परिषदेचा दावा
OBC Reservation : 'एल्गार' मेळाव्यासाठी छगन भुजबळांची नाशिकची टीमही नगरच्या मैदानात!
Published on
Updated on

Ahmednagar News : ओबीसी समाजाचा 3 फेब्रुवारीला नगरमध्ये 'एल्गार' मेळावा होत आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या व्यासपीठासाठी सोमवारी नगरमधील क्लेरा ब्रुस हायस्कुलच्या मैदानावर टेप टाकून श्रीफळ वाढवण्यात आले. 35 एकर मैदानावर एल्गार मेळावा होणार असून, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातून तब्बल दोन ते अडीच लाख ओबीसी बांधव येणार असल्याची माहिती समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्यासोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या अधिसूचनेनंतर मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई येथे ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक त्यांनी घेतली. तसेच नगरमध्ये 3 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता होत असलेल्या एल्गार मेळावाच्या नियोजनात भुजबळ यांनी त्यांची नाशिक टीमही उतरवली आहे.

समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर नाशिकमधील समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांबरोबर नगरमधील स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.(Chhagan Bhujbal Ahmednagar OBC Melava)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

OBC Reservation : 'एल्गार' मेळाव्यासाठी छगन भुजबळांची नाशिकची टीमही नगरच्या मैदानात!
Chhagan Bhujbal OBC Melava : मंत्री भुजबळांचे फलक फाडले; ओबीसी एल्गार मेळाव्याआधीच नव्या वादाला तोंड फुटणार ?

या मैदानाची स्वच्छता आणि इतर नियोजनाची यावेळी दिलीप खैरे यांनी पाहणी केली. मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची मोजणी झाली. तसेच मैदानाचे सपाटीकरणही करण्यात आले. या सभेला नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातून ओबीसी समाजबांधव मोठ्यासंख्येने येणार आहेत.

तर काहीजण एल्गार मेळावाच्या एकदिवस अगोदर मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या जेवणापासून ते मुलभूत सोयीपर्यंत सर्व नियोजन नगरमधील ओबीसी नेते आणि पदाधिकार्‍यांनी केली आहे. एल्गार मेळाव्याच्या दिवशी शहरातून वाहतूक देखील वळण्याची मागणी करण्यात आली आहे. सभास्थळी दीडशे ते दोनशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, 'हा एल्गार मेळावा कोणाच्याही विरोधात नाही. मराठा समाजामध्ये देखील ओबीसी बांधव आहेत. ते देखील ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही ओबीसी समाजाची पहिल्यापासून भूमिका आहे. पण ओबीसी(OBC) बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजामध्ये संभ्रम, तर ओबीसी समाजामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण केली आहे. आरक्षणावर राज्य सरकारमधील एकही मंत्री ठोस भूमिका मांडत नाही.'

OBC Reservation : 'एल्गार' मेळाव्यासाठी छगन भुजबळांची नाशिकची टीमही नगरच्या मैदानात!
OBC Melava : सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेनंतर आक्रमक भुजबळ नगरमधून फुंकणार संघर्षाचे रणशिंग!

तसेच 'मराठा आणि ओबीसी समाजाला राज्य सरकार झुंजवत आहे. दुही निर्माण करण्याचा प्रकार करत आहे. यातून ओबीसी समाज स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे. या एल्गार मेळाव्याला मराठा समाजाचा देखील पाठिंबा असणार आहे.' असंही बराटे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com