Chhagan Bhujbal News : अंबडच्या ओबीसी एल्गार परिषदेला नाशिकमधून मोठे बळ!

OBC Reservation issue, Nashik District will be the major suppot : सिन्नर, येवल्यासह जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे सुरू आहे जोरदार नियोजन
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

OBC Meeting at Ambad : ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. तसे झाल्यास ओबीसी घटकांवर अन्याय होईल, या मागणीसाठी उद्या अंबड (जालना) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार परिषद होत आहे. या परिषदेकडे राज्याचे लक्ष लागून आहे. (Chhagan Bhujbal will adress the OBC public meeting at Ambad- Jalna tomorrow)

समता परिषदेच्या पुढाकाराने अंबड येथे ओबीसी एल्गार परिषद (OBC) होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal) पंकजा मुंडे (Pankja Mundhe) यांसह विविध नेते त्यात भाग घेतील. या मेळाव्यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्याचा प्रमुख सहभाग असेल.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Maratha Reservation : जरांगे पाटील नाशिकला येऊन पुन्हा भुजबळांची झोप उडविणार?

ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार परिषद होत आहे.

या परिषदेसाठी सिन्नर, येवला, नाशिकसह जिल्ह्यातून पदाधिकारी जोरात तयारी करीत आहे. त्यासाठी अतिशय बारीक नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील माळी, वंजारी, धनगर यासह अठरापगड जातीतील समाजबांधव सहभागी होतील, अशी स्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी व भटक्या जमाती असा संघर्ष राज्यात उभा राहिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी ओबीसी प्रवर्गातील समाज घटकांची मागणी आहे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावरून मांडली जात आहे.

सामाजिक आरक्षणाच्या या मुद्द्यावर ओबीसींची मोट बांधण्यासाठी राज्यातील माळी धनगर व वंजारी समाजातील प्रस्थापित नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या अठरापगड जातींनादेखील सामावून घेण्यात आले आहे. आपले आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम राहावे, या मागणीसाठी ही परिषद होत आहे. या एल्गार मेळाव्याकडे राज्यातील सत्ताधारी, मराठा आरक्षणाचे समर्थक; तसेच राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Maratha Reservation : जरांगे पाटील आज खटाव तालुक्यात; मायणीत सभेची जय्यत तयारी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, सरचिटणीस समाधान जेजुरकर, योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, कविता कर्डक, महिला जिल्हा अध्यक्ष आशा भंदुरे, पूजा आहेर आदींसह विविध वरिष्ठ पदाधिकारी गेले दोन आठवडे त्यासाठी सक्रिय आहेत. त्यामुळे या मेळाव्यात मराठवाड्यातील समाज बांधवांसह नाशिकचा प्रमुख सहभाग व भूमिका असेल, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला.

सिन्नरमध्ये यंत्रणा सक्रिय

सिन्नर तालुक्यातील ओबीसी समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी गेल्या आठवड्यावर विविध गावांमध्ये बैठका व भेटी गाठींचे आयोजन करण्यात आले होते. समता परिषदेचे राजेंद्र भगत, राजेंद्र जगझाप, मेघा दराडे, डॉ. विष्णू अत्रे, रामभाऊ लोणारे, संदीप भालेराव, संतोष पवार, जयश्री पवार, शेखर कानडे, चंद्रकांत माळी, निवृत्ती पवार, युवा नेते उदय सांगळे, बंडूनाना भाबड आदींनी याबाबत जागृती केली आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Malegaon Shivsena Politics : अद्वय हिरे यांना चार दिवस पोलिस कोठडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com