Maratha Reservation : जरांगे पाटील आज खटाव तालुक्यात; मायणीत सभेची जय्यत तयारी

Maratha Kranti Morcha मायणी सकल मराठा बांधवांकडून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

-अंकुश चव्हाण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे लढवय्ये योद्धे मनोज जरांगे पाटील यांची आज खटाव तालुक्यातील मायणी येथे सायंकाळी पाच वाजता सभा होत आहे. त्यासाठी मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेवाडी (ता. खटाव) या गावचे मराठानगर असे नामकरण होणार आहे.

जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे दाैंडमधील सभेनंतर मायणीत दाखल होणार आहेत. त्यासाठी मायणीत सकल मराठा बांधवांकडून Maratha Reservation जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजता पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सभास्थळी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जरांगे पाटील यांची तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा मायणीत होत असून, सातारा जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. सभास्थळी अग्निशामक, रुग्णवाहिकेसह एक हजार स्वयंसेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. सभेपूर्वी भजन, शाहिरी पोवाड्यांचा आवाज घुमत आहे. Maharashtra Political News

या वेळी मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरच्या गुंडेवाडी (ता. खटाव) या गावाचे मराठानगर असे नामकरण जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सभेनंतर रात्री जरांगे पाटील मायणीत मुक्कामी असतील. शुक्रवारी (ता. १७) कराडला सभा हाेणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil
Satara Political News : कृष्णेच्या पाण्याची चोरी; स्वाभिमानी शेतकरी घेणार जलसमाधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com