Maharashtra Politics: कालवा सल्लागार समितीची बैठक आज नाशिक येथे झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री डॉ विखे पाटील उपस्थित होते. या बैठकीला काही अधिकाऱ्यांनी चक्क दांडी मारली होती. त्याची माहिती किंवा पूर्व सूचना देखील देण्यात आलेली नव्हती. विचारणा झाल्यावर ही माहिती मंत्र्यांना समजली.
त्यामुळे मंत्री चांगलेच संतापले त्यांनी नाशिकच्या अनुपस्थित अधिकाऱ्यांना थेट तंबीच देऊन टाकली. महत्त्वाच्या विषयांवरच्या बैठकीला अधिकारी दांडी मारत असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. बैठकीनंतर जे जे अधिकारी अनुपस्थित होते, या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीनंतर अनेक अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. विशेषतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला नसल्याने त्यांना आता मंत्र्यांना काय उत्तर द्यावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री विखे पाटील यांचा हा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दौरा होता. त्यामुळे तो चांगलाच चर्चेचा विषय बनला.
यावेळी भर बैठकीतच त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. या विभागाच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरांना पाणी देताना उधळपट्टी केली जाते. ही उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
बिगर सिंचनाचे पाणी वाचवून किंवा कमी करून ते सिंचनाला वर्ग करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांना आणि शहरांना जलवाहिनीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊ शकते. यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने योजना आखाव्यात असे त्यांनी सुचवले.
बिगर सिंचनाचे पाणी वाचवून किंवा कमी करून ते सिंचनाला वर्ग करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांना आणि शहरांना जलवाहिनीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊ शकते. यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने योजना आखाव्यात असे त्यांनी सुचवले.
जलसंपदा विभागाचे अधिकारीच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांना या विषयाचे गांभीर्य नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने आता सुधारणा करावी असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
गंगापूर प्रकल्पाचे कालवे आणि उपप्रकल्प जुने झाले आहेत. त्यामुळे त्यातून पाण्याची गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत लवकरच काम हाती घेतले जाईल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.