`तो` दक्षिण अफ्रिका, दुबई, दिल्लीहून आला अन् `ओमायक्रॉन` घेऊन आला!

गलथानपणा...`ओमायक्रॉन` असलेल्या युवकाची केपटाऊन, दुबई, दिल्लीला तपासणीच झाली नाही?.
Airports
AirportsSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कोरोनाची तिसरी लाट अर्थात ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगभरात अनेक देशांनी धसका घेतला आहे. केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र महाराष्ट्रातील पहिला रुग्ण असलेला युवक दक्षिण अफ्रिका (केपटाऊन), (South Africa) दुबई, (Dubai) दिल्लीमार्गे (Delhi) मुंबईला (Mumbai) आला. मात्र एकाही विमानतळावर त्याची चाचणी किंवा क्वारंटाईन केले नाही. त्यामुळे विमानतळांची आरोग्य यंत्रणा चर्चेत आली आहे.

Airports
भाजपमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाने प्रभारी जयकुमार रावल यांना धक्का?

हा धोका की गलथानपणा याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विविध देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा व प्रवासी यांच्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील यंत्रणा किती सक्षम व दक्ष आहेत, याची चर्चा शनिवारी डोंबिवलीत आढळलेल्या पहिल्या रुग्णाच्या निमित्ताने सामाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

शनिवारी (ता. ४) महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला. हा ३३ वर्षीय युवक २४ नोव्हेंबर २०११ या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आला. या तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे .

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबरला या प्रवाशाला सौम्य ताप आला, तथापी इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोल्डि केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासियांच्या आणि २३ कमी जोखमीच्या निकट दूर सहवासियांचा शोध घेण्यात आला आहे. हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत.

Airports
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासियांचा शोध घेण्यात येत आहे.

पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय नागरिकाचा जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला आहे. या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळलेला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे. इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे. मग अशी तपासणी अन्य विमानतळांवर झाली नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण खरोखर गांभिर्याने होते किंवा नाही हे तपासण्याची गरज आहे. डोंबिवलीचा युवक तीन आतरराष्ट्रीय विमानतळांवरून मुंबईत आला. मात्र त्याची कुठेच तपासणी झाली नसावी का? हा चर्चेचा विषय आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com