Onion Price Politics : सरकार तर व्यापाऱ्यांपेक्षाही एक पाऊल पुढे, १०० कोटी थकवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Onion Farmers Hit by ₹100 Cr Govt Delay Before Diwali: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ने १०० कोटी रुपये थकवल्याने शेतकऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
onion farmers protest
onion farmers protestSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Onion Farmers : केंद्रातील सरकारच्या संस्था असलेल्या ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांनी भाव पाडून कांदा खरेदी केली. आता शेतकऱ्यांचे शंभर कोटी रुपये थकवले. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या आनंद हिरावला आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपचे डबल इंजीन सरकार आहे. या सरकारला लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावर बॅकफूटवर जावे लागले होते. मात्र अद्यापही चार मंत्री असलेल्या जिल्ह्यात कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकलेले नाही.

शेतकऱ्यांचा कांदा केंद्र सरकारच्या संस्थांनी आधीच कमी दरात खरेदी केला. नंतर ऐन हंगामात हाच कांदा बाजारात आणला. निर्यातीवरशुल्क आकारणी केली. त्यामुळे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात आपला कांदा विकावा लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात हे घटले.

onion farmers protest
Prakash Londhe Controversy: आरपीआय नेता प्रकाश लोंढे याने शोधली होती कमाईची नवी शक्कल, काय आहे प्रकरण?

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने ग्राहकांसाठी किंमत स्थिरीकरण निधी योजना आणली. त्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ या नोडल एजन्सी आहेत. त्यांनी उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा खरेदी केला. यातील २५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

onion farmers protest
BJP, Eknath Shinde Politics: भाजप, एकनाथ शिंदे यांच्या पडद्यामागे स्वबळाच्या जोर बैठका, महायुतीची शक्यता अधांतरी?

खरेदी होऊन तीन महिने उलटले आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना देयके मिळालेली नाही. दिवाळीच्या सणातही आपल्यात हक्काच्या पैशांसाठी सरकार शेतकऱ्यांना रडवत आहे. हक्काच्या कांद्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.

यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांचा कारभार संशयाच्या फेऱ्यात आहे. या संस्थेने भाजपच्या नेत्यांच्याच शेतकऱी ग्राहक संस्थांकडून ही खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. या संस्थांकडे कोणतीही यंत्रणा नव्हती.

नाफेडच्या संचालक व अध्यक्षांनीच याबाबत अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्या आहेत. मात्र यामध्ये गैरकारभाराचे आरोप असलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

त्यावरही कडी होईल, असे काम अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा स्वस्तात खरेदी केला. त्यावर अनुदान घेतले. हाच कांदा बाजारात ग्राहकांना विक्री केला. मात्र शेतकऱ्यांना अद्याप पैसे दिलेले नाही. या राजकीय भ्रष्टाचारावर लोकप्रतिनिधी आवाज उठवणार का? याची शेतकरी विचारणा करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com