Nashik News; शेतकऱ्यांचा इशारा, अन्यथा विधानभवनावर कांदे फेकू!

केंद्रातील सरकारच्या अपयशी धोरणामुळेच कांदा, द्राक्षांचे दर कोसळले, सरकारने उपाय न केल्यास पुन्हा आंदोलन.
Farmers agitation at Wani
Farmers agitation at WaniSarkarnama

नाशिक : (Nashik) कांदा उत्पादकांच्या मनातील खदखद गेले काही दिवस सतत व्यक्त होत आहे. आज यासंदर्भात द्राक्ष व कांदा दर कोसळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Sanghtana) आज वणी येथे गुजरातला (Gujrat) जाणारा महामार्ग रोखला. विविध प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) व विविध शेतकऱ्यांनी (Farmers) आंदोलन झाले. त्यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली. (Swabhimani Farmers sanghtana warns centre & State Government on Farmers issues)

Farmers agitation at Wani
Sanjay Raut News; दिल्लीचा गोलमाल चालू देणार नाही!

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. वणी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी कांदा व द्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. रस्त्यावर द्राक्ष व कांदा टाकून रस्ता रोको केला.

Farmers agitation at Wani
Dhule News; महापौरांचा संताप....80 लाख खर्च तरीही शहरात कचरा कसा?

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झालेले आहेत. द्राक्ष, कांदा, सोयाबीन ,कपाशी यासारख्या पिकांचे बाजारभाव गडगडले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. पिकविम्याचे पैसे मिळत नाही. त्यातच वीजदर वाढ सरकारने प्रस्तावित केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे विज बिल थकले आहे त्यांचे कनेक्शन कट होत आहे. एक बाजूला शेतमालाला भाव नाही. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे .

संपूर्ण राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या राज्यभरातील रस्ता रोको आंदोलनाला आज नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यात कांदा आणि जिल्हा बँकेचा प्रश्न तीव्र झाला आहे. याविरुद्धचा संताप वणी येथे संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Farmers agitation at Wani
Shivsena News; गद्दारांनो, शाखांना हात लावाल तर फडशा पाडू!

जिल्ह्यातील सुमारे 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे. याविरुद्ध पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन झाले होते. याकडे तातडीने लक्ष न घातल्यास विधानभवनावर कांदे फेकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कांदा चार ते सहा रुपये किलो या दराने विकला जात आहे. बांगलादेशासारखा देश आपला कांदा खरेदी करीत नाही. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आपण अनेक शत्रू तयार करून घेतले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. जगामध्ये नव्या बाजारपेठा शोधण्यात हे सरकार अपयशी ठरलंय.

- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com