Beed News : लोकनेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी तीर्थक्षेत्र भगवानगड येथे सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यंदाचा मेळावा सुपे सावरगाव (ता.पाटोदा, जि. बीड) येथे उद्या (ता. २४) होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करीत सूचना केल्या आहेत.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येने मुंडे समर्थक आणि भगवान बाबांचे भक्त येत असतात. यामुळे आता उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी मुंडे समर्थक, कार्यकर्ते आणि भगवान बाबांच्या भक्तांना काही सूचना केल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"माझा मेळावा शहरातल्या मोठ्या मेळाव्यासारखा नाही. या ठिकाणी मोठी व्यवस्था नाही, खुर्चा नाहीत, जेवणाची सोयही नाही; पण गेल्या अनेक वर्षांपासून लोकं इथे येत आहेत. जेवणाचा डबाही घरूनच घेऊन येतात. माझा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, तो वंचितांचा आहे, असेही पंकजा मुंडे यांनी यापूर्वी सांगितले आहे.
घरातून निघाल तेव्हा तुमच्यासाठी खाण्याची वस्तू घेऊन या. पाण्याची बॉटल घेऊन या.
गडावर पोहाेचाल तेव्हा तुम्ही गाडीदेखील चांगल्या ठिकाणी पार्क करा, ज्यामुळे दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही.
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रुमाल, टोपी घेऊन या.
थोडे लवकर निघा. वेगाने गाडी चालवू नका. मोबाईल वापरू नका
सकाळी 11 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी पोहाेचाल असे निघा. स्वतःची काळजी घ्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.