Mahayuti dispute : महायुतीच्या मंचावरच ‘फालतूगिरी’चा वाद; पारनेरमध्ये सावंत-कोरडे भिडले, दातेंची ‘शेवटची वॉर्निंग’

Mahayuti leaders clash over development credit in Parner; MLA Kashinath Date issues a final warning : विकासकामांच्या श्रेयावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपचे विश्वनाथ कोरडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक
MLA Kashinath Date
MLA Kashinath Date Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti internal dispute : महायुतीत ग्राउंड कुछ भी अलबेल नसल्याचं पारनेर येथील एका घटनेवरून समोर आले आहे. पारनेरचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते आणि समोर बसलेल्या गावकऱ्यांसमोरच महायुतीमधील वरिष्ठ पदाधिकारी एकमेकांना भिडले.

विकास कामाच्या उद्घाटनाचा मंच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमधील श्रेयवादाच्या आखाड्यात बदलला. 'फालतूगिरी', 'दाखवून देईन', 'कच्च्या गुरूचा चेला नाही', 'बिनडोक' अन् 'वाॅर्निंग', अशा शब्दांनी हा श्रेयवादाचा आखाडा गावकऱ्यांसमोरच रंगला.

पारनेर (Parner) तालुक्यातील देवीभोयरे येथे विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम होता. अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते यांच्या सत्कारासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यात कामात श्रेयवाद रंगला. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, महायुतीमधील कार्यकर्त्यांना एकत्रित राहण्याचा सल्ला दिला होता.

अशोकराव सावंत यांनी विविध विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) असल्याचे सांगत, देवीभोयरे देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचे श्रेयही राष्ट्रवादीकडे असल्याचा दावा केला. सावंत यांच्या या वक्तव्यावर विश्वनाथ कोरडे यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे पाहत कोरडे यांनी ‘आमदार साहेब, यामुळेच आम्ही तुमच्या कार्यक्रमांना येत नाही.’ कोरडे यांच्या वक्तव्यावर सावंत यांनी आक्रमक होत,‘ये, तुझं मी ऐकत नाही!’ असे सावंत म्हणाले. कोरडे यांनीही माघार घेतली नाही. ‘काय फालतूगिरी आहे ही? यांच्यामुळे आम्ही येत नाही. मुद्यांवर बोल!’ असे कोरडे यांनी सुनावले.

MLA Kashinath Date
Jayashree Thorat Case : जयश्री थोरातांसह 3500 आंदोलकांवर गुन्हा; बाळासाहेब थोरातांचे नाव नाही, चर्चांना उधाण

सावंत यांनी आपली भूमिका कायम ठेवत ‘मी मुद्यावर बोलतोय. कुणाच्याही दडपणाखाली मी वागणार नाही,’ असे सुनावले. कोरडे यांचं प्रत्युत्तर ‘नका दडपणाखाली वागू; इथे कशाला इज्जत घेता?’ व्यासपीठावरील हा रंगलेला राजकीय आखाड्यावर समोर प्रेक्षक म्हणून आनंद घेत होते. आमदार काशिनाथ दाते यांनी हस्तक्षेपाचा प्रयत्न केला. सावंत यांनी यावर, ‘एक मिनिट सर, मी जिल्हाध्यक्ष आहे. मला बोलायचं आहे,’ अशी भूमिका घेतली. यावर कोरडे यांनी ‘ते जिल्हाध्यक्ष तुमच्या घरी; आमच्याकडे चालू देणार नाही,’ अशा शब्दांत सुनावले.

MLA Kashinath Date
Dheerajsinh Rajput Murder Case : पाकिस्तान-फिलिस्तीन कनेक्शनचा दावा; धीरजसिंह हत्या प्रकरणात CBI चौकशीची मागणी, ठाकरेंच्या शिलेदाराने दिला संदर्भ

मी काही कच्चा गुरूचा चेला नाही

‘या तालुक्याचा आमदार आमच्या पक्षाचा आहे. कामांचे श्रेय आमचेच आहे,’ असे सावंत यांनी सांगत. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून आमदार दाते यांनी सावंत यांना माईकपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी यावर नाराजी व्यक्त करत, ‘आम्ही यायचे नाही का?’ असा सवाल केला. ‘मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही!’ असे म्हणत सावंत यांचा पारा आणखी चढला.

भाजपच्या कोरडेंचा थेट इशारा

‘देवीभोयरेच नाही तर तालुक्यात कुठेही कोरडे यांची मनमानी खपवून घेणार नाही. मी दाखवून देईन. मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही.’ त्यावर कोरडे यांनीही थेट आव्हान दिले ‘दाखव, इथे दाखव आता!’ वादाच्या ओघात कोरडे यांनी सावंत यांच्यासाठी ‘बिनडोक’ हा शब्द वापरले. दोघांमधील शा‍ब्दिक चकमक चांगली वाढली.

आमदार दातेंनी दोघांना फटकारले

अखेर आमदार काशिनाथ दाते यांनी महायुतीतील शिस्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले ‘मी फक्त राष्ट्रवादीचा आमदार नाही. मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, आरपीआय आणि इतर घटक पक्षांचा आमदार आहे.’ दोन्ही नेत्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देताना, ‘इथे मी तुम्हाला वॉर्निंग देतो. ही माझी शेवटची वॉर्निंग आहे. अनेक वेळा झालं, आज जरा जास्त झालं.’ आमदार दाते यांनी सुनावल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले.

अशोक सावंत म्हणाले...

अशोक सावंत म्हणाले, "मी आमच्या भूमिकेवर ठाम आहे. मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. काम आम्ही केले, त्याचे श्रेय पक्षालाच मिळायला पाहिजे. तेच आम्ही मागत आहोत. अगोदर बोलून सुद्धा पुन्हा बोलायला उभे राहिले. आम्ही काही चुकीचे वागलो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील तक्रार मांडली आहे."

विश्वनाथ कोरडे म्हणाले...

विश्वनाथ कोरडे यांनी, भाषणातील विधान सुधारावे, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी देखील त्यांचे दोन ते चार वेळा प्रकार झाले आहेत. मला काम करायला आवडते. ज्यानी त्याने आपापली रेष मोठी करावी. त्यांची रेष मोठी व्हावी, त्याची आम्हाला काहीच अडचण नाही.पण आमच्याकडे वळू नये. त्यांच्या भाषणाचा त्रास आमदार आणि महायुतीमधील कार्यकर्तांना होतो. त्यांनी ते टाळावे. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, एवढीच माफक आपेक्षा आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com