Bachchu Kadu On Sangram Jagtap : 'जसा गुरू तसा चेला'; बच्चू कडूंचा जगतापांच्या लोकांच्या दहशतीवर 'प्रहार'

Bachchu Kadu Reacts to Allegations Against MLA Sangram Jagtap in Ahilyanagar Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांची लोक करत असलेल्या दहशतीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Bachchu Kadu On Sangram Jagtap
Bachchu Kadu On Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Political controversy Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक चांगलीच तापली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या लोकांच्या दहशतीचे ठोकशाहीचे व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही तासाच्या अंतरावर समाज माध्यमांवर पोस्ट केले.

यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आमदार जगताप यांच्या लोकांच्या दहशतीवर आता प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. बच्चू कडू श्रीरामपूर इथं आले असताना, त्यांनी या प्रकारावर 'प्रहार' केला.

बच्चू कडू म्हणाले, "त्यांचेच नेते दमदाटी करत आहे, असे सांगून अजित पवार यांच्याकडे बोट केले. संग्राम जगताप (Sangram Jagtap) हा लहानसा प्यादा आहे. जसा गुरू, तसा चेला." अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीचे पाच बिनविरोध होत आहेत, याकडे देखील बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.

राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या दहशतीवर बोलताना, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या व्हिडिओवर देखील बच्चू कडू (Municipal Election) यांनी बोट ठेवले. "नार्वेकरांची बोलणे ऐकले असेल , ही अरेरावी आणि तानाशाही आहे. लोकांनी मोघलांना उखडून फेकल , यांना जेव्हा उखडून फेकलं, तर यांचे झेंडे आणि त्याचे लहान लहान तुकडे देखील भारतात सापडणार नाही," असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.

Bachchu Kadu On Sangram Jagtap
Sangram Jagtap And Sushma Andhare : सुषमा अंधारे काही थांबेना, आणखी एक व्हिडिओ आणला समोर; जगतापांच्या लोकांच्या दहशतीविरोधात 'व्हिडिओ बाॅम्बवर.., बाॅम्ब..!'

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप अन् अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या युतीचे सर्व सूत्र आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हातात आहे. युतीच्या प्रचारासाठी कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येऊन गेले. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील प्रचारात सहभागी झाले होते.

Bachchu Kadu On Sangram Jagtap
BMC Election : मुंबईच्या रणसंग्रामात 1700 उमेदवार; लक्ष मात्र शिवसेना उबाठा अन् भाजपच्या 7 हायव्होल्टेज लढतींकडे

नैसर्गिक युती नसल्याची खदखद

भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर भाजपमधील निष्ठावंत नाराज आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रचार रॅलीपासून भाजपचे जुने-जाणते लांब राहिले होते. निष्ठावंतांना डावलून उपरे घेऊन, भाजप ही निवडणूक लढत असल्याच्या तक्रारी आहेत. ही नैसर्गिक युती नाही, अशी तक्रार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत येणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी (ता. 8) प्रचार सभा होणार आहे. त्यावेळी भाजपचे जुने- निष्ठावंत, यांची खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे. फडणवीस यावर काय तोडगा काढतात, याकडे आता लक्ष आहे. अहिल्यानगरमधील भाजपचे निष्ठावंत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभेत सहभागी होणार का? यावर चर्चा आता रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com