स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाशिकच्या नागरिकांत संतापाची भावना!

खासदार हेमंत गोडसे यांची प्रलंबित कामाबाबत बैठक
Hemant Godse with Smart city Officers
Hemant Godse with Smart city OfficersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रलंबित कामांना गती द्यावी. कोरोनामुळे ठप्प असलेली कामे शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण करावीत. अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्या. स्मार्ट सिटीच्या (Smart City) प्रलंबित कामांचा नुकताच खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी आढावा घेतला.

Hemant Godse with Smart city Officers
ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुका नकोत

कोरोनामुळे दीड वर्षे कामे ठप्प असल्याने पूर्ण होऊ शकली नाहीत. त्याअनुषंगाने खासदार गोडसे यांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत आढावा घेतला. स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Hemant Godse with Smart city Officers
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या बैठकीतून शेतकरी निघून गेले

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली शहरातील ५४ प्रकल्पांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. त्याविरोधात शहरातील नागरिकांचा संताप आहे. स्मार्ट सिटीच्या विकास कामांचा दर्जा तपासला जात नाही. त्यांची गती अतिशय संथ असल्याने ही कामे वाढीव मुदतीत तरी पूर्ण होणार का या विषयी प्रश्नचिन्ह आहे. संथगतीमुळे प्रकल्पांच्या किमतीत वाढ होणार असल्याच्या तक्रारी आहे. स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून सुमारे एक हजार कोटीचा निधी मंजूर झालेला असून स्मार्ट सिटी, पीपीपी मोड, कन्हर्जन आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) या चार वर्गांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

संथ कामकाज

स्मार्ट सिटी अंतर्गत १९ कामे असून त्यापैकी सात कामे पूर्ण झाली आहे. आठ कामे प्रगती पथावर असून पाच कामे डीपीआर स्तरावर आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मोड अंतर्गत नऊ कामांचा समावेश असून पैकी दोन कामे पूर्ण झाली आहेत. चार कामे प्रगतिपथावर असून तीन कामे डीपीआर स्तरावर आहेत. कन्व्हर्जन गटात एकूण १९ कामांचा समावेश असून ११ कामे पूर्ण झाली आहेत. सात कामे प्रगतिपथावर असून एक प्रकल्प डीपीआर स्थरावर आहे. सामाजिक दायित्व गटात पाच कामांचा समावेश असून चार कामे पूर्ण झाली आहेत तर एक काम डीपीआर स्थरावर असल्याचे माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com