येवला : शिवसेनेसाठी सध्याचा (Shivsena) काळ हा सुरुवातीपासूनच संघर्षाचा राहिलेला असून, शिवसेनेत यापूर्वी देखील अनेक बंड झाले आहेत. शिवसेनेत बंड केलेल्या आमदाराला आपल्या मतदारसंघात पुन्हा निवडून येता येत नाही हा इतिहास आहे. शिवसेनेची पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करून पक्ष निश्चितच गरुडझेप घेईल असा विश्वास येवला-लासलगाव (Yeola) मतदार संघाचे संपर्क प्रमुख किशोर चव्हाण (Kishor Chavan) यांनी सांगितले. (People will teach lesson to rebel MLA)
राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना आता पक्षसंघटन मजबुतीवर भर दिला आहे. त्यांतर्गत आज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेचा संवाद मेळावा झाला. यावेळी श्री. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. शिवसेनेत अनेक नेते आले आणि स्वार्थासाठी शिवसेना सोडून गेले, मात्र शिवसेनेचा इतिहास आहे, कि भुजबळ, राणे, राज ठाकरे अनेक दिग्गज शिवसेना सोडून गेले, पण तालुक्यातील एकही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ शिवसेना सोडलेली नाही. आताही जे काही घडले, त्या संकटकाळात तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. अशी भूमिका मांडून घोषणा देत उपस्थित सर्वांनी हात उंचावून शिवसेनेतच असल्याची ग्वाही दिली. उपस्थितीत सर्व शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, उध्दवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.
तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी हे निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याने आनंद झाला आहे याचा अहवाल मातोश्रीवर देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे, वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहर संघटक राहुल लोणारी, समन्वयक धिरजसिंग परदेशी, चंद्रमोहन मोरे, चंद्रकांत शिंदे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुमित्रा बोठे, दत्तू देवरे, नंदू पुणे, युवा सेनेचे अरुण शेलार आदींनी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले.
यावेळी संपर्क प्रमुख चव्हाण यांच्या हस्ते महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी दीपाली नागपुरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुंबईहून आलेले अजित मोरे, अनंत धुरी, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भागीनाथ थोरात, प्रवीण लहरे, दिलीप बोरणारे, शिवाजी बोराडे, शाम त्रिवेदी, शेखर शिंदे, नानासाहेब खैरनार, देविदास खैरनार, अरुणा शिरसाठ, अशोक अव्हाड, सागर गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, योगेश साबळे, अरुण शेलार, बापूसाहेब चव्हाण, सागर शेलार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.