Ahmednagar Namantar and Maharashtra Goverment : अहमदनगर शहराचे नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे असतानाच, हा मुद्दा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात नेला. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नामांतराविरोधात याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकारने अहमदनगर(Ahmednagar) महापालिकेकडून घाईघाईने अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतराचा ठराव करून घेतला. या ठरावावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करत केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने नामांतराचा घाट घातला. परंतु केंद्र सरकारकडून प्रस्तावावर मंजूर होण्यापूर्वीच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नामांतराला न्यायालयात आव्हान दिले. औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेत, त्यावर 25 जुलैला पहिली सुनावणी होणार आहे.
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर व्हावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त सोहळ्यात अहिल्यानगर नावाची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी या घोषणेला मूर्त रूप यावे यासाठी अहमदनगर महापालिकेकडून राज्य सरकारने प्रस्ताव मागून घेण्यात आला. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे.
नामांतराच्या मुद्यावर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामाजिक संघटना, काही राजकीय संघटनांनी नामांतराविरोधात राज्य सरकारचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन दिले. आता केंद्र सरकारकडे प्रस्ताव असतानाच आणि त्यावर निर्णय होण्यापूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांनी नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यावर 25 जुलैला पहिली सुनावणी होणार आहे.
या याचिकेमुळे नगरच्या नामांतराचा मुद्दा नेमकं कोणता वळण घेतो, याची चर्चा सुरू झाली आहे. या याचिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या नामांतराच्या मागणीला खोडा बसतो की काय, या चर्चा आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.